शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’च्या नोकर भरतीस स्थगिती

By admin | Updated: July 1, 2016 00:17 IST

तातडीने अहवाल द्या : साखर सहसंचालकांचा प्रशासकीय मंडळास आदेश

राशिवडे : भोगावती सहकारी साखर कारखान्यात झालेल्या नोकर भरतीस स्थगिती देऊन या भरतीबाबतचा अहवाल तातडीने पाठविण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी ‘भोगावती’च्या प्रशासक मंडळाला दिले आहेत. विशेष लेखापरीक्षक अजय ससाणे यांच्या अहवालाची दखल घेत हा आदेश देण्यात आला आहे. हा आदेश गुरुवारी दुपारी प्रशासक मंडळाला मिळाल्याचे समजताच सोशल मीडियावरून तो तत्काळ ‘भोगावती’च्या कार्यक्षेत्रात गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.‘भोगावती’च्या नोकर भरतीबाबत सहकारमंत्री चंद्र्रकांतदादा पाटील यांच्याकडे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले व सुभाष जाधव यांनी तक्रार देऊन नियमबाह्य नोकर भरती झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या तक्रारीची दखल घेत चौकशीसाठी विशेष लेखापरीक्षक अजय ससाणे यांची नियुक्ती केली होती. ससाणे यांनी अहवालात ५८० जणांची नोकर भरती करताना शासन परवानगी, साखर आयुक्त, सहआयुक्तांची परवानगी न घेता बेकायदेशीर नोकर भरती केली असल्याचे नमूद केले आहे. या अहवालानुसार प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी या नोकर भरतीस स्थगिती देऊन केलेल्या कारवाईचा वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे आदेश ‘भोगावती’च्या प्रशासकीय मंडळाला दिले आहेत. १४ जूनला पत्राद्वारे कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कार्यवाही झाली नसल्याने पुन्हा नवीन आदेश काढून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.अनेकांचे धाबे दणाणले‘भोगावती’त नोकर भरतीवरून मोठा गदारोळ झाला होता. मोठ्या आर्थिक उलाढाली होऊन ही नोकर भरती झाली होती. नोकर भरतीचा आकृतिबंध पाळला नसल्याने ही नोकर भरती वादग्रस्त बनली होती. अशातच साखर सहसंचालकांनी या भरतीस स्थगिती देऊन अहवाल पाठविण्याचे आदेश दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.