शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ लिपिक पदोन्नतीबाबतचे ठराव निलंबित

By admin | Updated: May 11, 2016 01:06 IST

‘नगरविकास’चा दणका : खात्यांतर्गत परीक्षेची अट कायम राहणार

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने आस्थापनेवरील ‘कनिष्ठ लिपिक वर्ग - ३’च्या संवर्गातील पदोन्नतीबाबत मंजूर केलेला ठराव क्रमांक २४० व त्याची उपसूचना (क्रमांक ४२) पूर्णत: निलंबित करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्यासंबंधीचा आदेश उपसचिव अ. र. परशुरामे यांनी काढला आहे.या आदेशात म्हटले आहे, ‘महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे ठराव क्रमांक २४० (दि. २० मे २०१५) मधील उपसूचना आणि ठराव क्रमांक ४२ (दि. २७ आॅगस्ट २०१५) ही विविध संवर्गातील पदोन्नतीसाठी विहीत केलेल्या विभागीय परीक्षेची तरतूद रद्द करावयाची असून, मुंबई प्रांतिक कायदा १९४९ च्या कलम ४६५(१) अंतर्गत विनियमित केलेल्या तरतुदींशी विसंगत असल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका कायदा १९४९ मधील कलम ४५१ (१)नुसार ठराव क्रमांक २४० मधील उपसूचना व ठराव क्रमांक ४२ पूर्णत: निलंबित करण्यात येत आहे. महापालिका कायदा कलम ४५१(२) नुसार आदेशाच्या दिनांकापासून महिन्याच्या आत संबंधितांना अभिवेदन करण्यास संधी देण्यात येत आहे. ती न केल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे म्हटले आहे.महापालिकेच्या आस्थापनेवरील ‘कनिष्ठ लिपिक वर्ग-३’ संवर्गातील पदोन्नतीसाठी नियमातील तरतुदीनुसार कार्यपद्धती अवलंबण्यास मान्यता व्हावी म्हणून आॅफिस प्रस्ताव आला होता. त्यामध्ये खात्यांतर्गत परीक्षा प्रस्तावित करण्यात आली. ज्या कर्मचाऱ्यांची सलग सेवा ५ वर्षे पूर्ण झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांना परीक्षेची अट शिथिल करण्यात यावी. शिपाई व पवडी कामगारांसाठी पूर्वी २० टक्के जागेचे धोरण मंजूर होते. त्याऐवजी शिपाई व पवडी कामगारांसाठी ३५ टक्के जागेचे धोरण मंजूर करून सफाई व झाडू कामगारांसाठी असलेले २५ टक्के जागेच्या धोरणाऐवजी ३५ टक्के जागा मंजूर करण्याबाबत उपसूचना दिली होती. (प्रतिनिधी)