शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यनारायण कोपले... ‘कूलसिटी’ बहरली!

By admin | Updated: May 4, 2015 00:23 IST

सलग सुट्यांमुळे गर्दी : अंगाची लाहीलाही घालविण्यासाठी हजारो पर्यटक महाबळेश्वरात दाखल

महाबळेश्वर : महाराष्ट्र दिन व शनिवार, रविवार आणि सोमवारी बुध्द पौर्णिमा अशा सलग सुट्या आल्यामुळे पुणे, मुंबई, कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागांतून हौसी पर्यटक महाबळेश्वर शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेले आहेत. संपूर्ण राज्यात सूर्यनारायण कोपले असल्याने जीवाला गारवा मिळण्यासाठी कूलसिटी पर्यटकांनी बहरू लागली आहे. हौसी पर्यटक सुट्यांमध्ये महाबळेश्वरमधील निसर्गरम्य पर्यटनस्थळांना भेट देणे पसंत करतात; परंतु मे महिन्यात उन्हाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वरातील गुलाबी थंडीची मजा लुटण्यासाठी तर मे महिन्यात तिन्ही ऋतूंचा आनंद घ्यायला मिळत असतो. उन्हाळा सुरू झाल्यापासून लाखो पर्यटक देश-विदेशातून महाबळेश्वरला येत असतात. पुणे-मुंबई कोल्हापूर येथील शालेय परीक्षाचे निकाल लागल्यानंतर व कार्पोरेट क्षेत्रात काम करत असलेली मंडळी सहकुटुंब पर्यटनासाठी महाबळेश्वरात येत असतात. महाबळेश्वरला येणारे बहुतांश पर्यटक हे प्रतापगड, तापोळा, पाचगणी क्षेत्र, महाबळेश्वर आॅर्थरसीट पॉइंटला येत असतात. तेथील निसर्गरम्य परिसराचा नजराना पाहण्यासारखा असतो. सध्या सायंकाळची थंडी चांगलीच असल्यामुळे धुक्याची चादर पांघरलेले महाबळेश्वर तापोळा, प्रतापगड आर्थरसीट पॉइंट पाहण्यासारखे आहे. महाबळेश्वरला सध्या गर्दीचा हंगाम असल्याने हॉटेल, लॉजचे दर तेजीत आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक आजूबाजूच्या गावातील बंगले किवा वाई, सातारा येत आहेत. दिवसभर महाबळेश्वरमध्ये पर्यटनाचा आनंद घेऊन मुक्कामी पुन्हा हॉटेलला जातात. वेण्णा लेक नौकाविहार, केट्स पॉइंट, आर्थरसीट पॉइंट विल्सन पॉइंट मुंबई पॉइंट, लॉडविक पॉइंट ही ठिकाणे पर्यटकांनी फुलली आहेत. बाजारपेठत चपला, जाम, मका, पॅटीस, आईस्किम तसेच गरमागरम मका पॅटीस खाण्याचा आनंद लुटत आहेत . महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना ब्रिटिशकालीन पॉइंटच पाहावे लागतात. ‘भुशी डॅम’च्या कामाचा निधी पालिकेत मंजूर होऊन पडलेले असून, कामे पूर्ण झालेले नाही. ही कामे पूर्ण झालीत तर येणारे पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात होईल. दोन दिवसांऐवजी चार दिवस पर्यटकराजा मुक्काम करेल. यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल. (प्रतिनिधी)