शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद असला तरी लसीच्या तुटवड्यामुळे या मोहिमेत अडथळे येत आहेत. सुरुवातीला लसीकरणाबाबत गैरसमजूत असल्याने नागरिकांत जागृती करावी लागली. त्यानंतर दुसरी लाट जोरात आल्याने लसीकरणाला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला. शहरात शासकीय सहा केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे. त्याचबरोबर काही लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी उपकेंद्रे तयार करून तेथूनही लस देण्याचे काम सुरू केले आहे. शहरात दररोज १५०० पासून ते ३००० पर्यंत डोस येतात. दररोजची तफावत मोठी असून, किती डोस येणार, हे लस केंद्रावर पोहोचल्यानंतरच समजते. परिणामी सकाळपासून रांगा लावून थांबलेल्या नागरिकांना परत जावे लागते. आजतागायत शहरात एकूण ४३ हजार ७१० जणांना लस देण्यात आली आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे सध्या लसीकरण सुरू आहे.
इचलकरंजीत मागणीपेक्षा पुरवठा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST