शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

भाजपमध्ये ‘दक्षिण’च्या उमेदवारीवरून सुंदोपसुंदी

By admin | Updated: September 14, 2014 00:35 IST

आरोप-प्रत्यारोप : चंद्रकांतदादांवर टीका

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपच्या कार्यकर्त्यांतच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूझाले आहेत. पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावर आज, शनिवारी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील, बाबा देसाई व राजाराम शिपुगडे या इच्छुक उमेदवारांनी हल्ला चढविला आहे. तुम्ही वीस वर्षे पक्षासाठी काम केले आणि आम्ही पस्तीस वर्षे काम केले. त्यावेळी आम्हालाही कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही याची आठवण जाधव यांना करून देण्यात आली आहे.पक्षासाठी मी वीस वर्षे घरदार, कुटुंबाकडे दुर्लक्ष करून काम करीत असून, आम्हाला सोडून इतरांचा उमेदवारीसाठी का विचार केला जात आहे, अशी विचारणा महेश जाधव यांनी गुरुवारी झालेल्या मेळाव्यात आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनाच केली होती. तसे भाजपमध्ये आमदार चंद्रकांतदादा पाटील हेच गेली वर्षभर महेश जाधव यांच्या ‘दक्षिण’मधील उमेदवारीबाबत घोषणा करीत होते. आता त्यांनीच अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजी वाढू नये या हेतूने आर. डी. पाटील यांनी हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. आर. डी. पाटील यांनीही शहरात सर्वत्र डिजिटल फलक लावून उमेदवारीची मागणी केली आहे.त्यात म्हटले आहे की, भाजपमध्ये उमेदवारी देण्याचा अधिकार चंद्रकांतदादांना नाही. ती देण्याची पक्षाची पद्धत ठरलेली आहे. पक्षासाठी उमेदवारी मागितल्यावर मुंबईहून पक्षाचे निरीक्षक येतात. त्यांचा अहवाल निवड समितीमार्फत संसदीय मंडळाकडे पाठविला जातो व तिथे उमेदवारी निश्चित होते. बाहेरून पक्षात येणाऱ्यांचे स्वागत केले पाहिजे. त्यांना उमेदवारी नाकारण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर नाही. तो पक्ष नेतृत्वाचा अधिकार आहे; परंतु पक्षामध्ये मी एकट्यानेच काम केले आहे व मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे, अशा पद्धतीचा मेळावा घेऊन पक्षावर दबाव आणणे योग्य नाही.