शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

श्रीपूजकांसह ‘राष्ट्रवादी’च्या दोघांना समन्स

By admin | Updated: April 19, 2016 00:59 IST

कारवाई कराच : दीपा पाटील

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर गाभाऱ्यातील प्रवेश प्रकरणावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या श्रीपूजकांसह राष्ट्रवादीच्या दोघा कार्यकर्त्यांना सोमवारी पोलिसांनी समन्स बजावली. ‘आपल्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल असून चौकशीकामी पोलिस ठाण्यात हजर राहावे,’ अशी सूचना त्यामध्ये करण्यात आली आहे. कायद्यातील तरतुदींची पूर्तता करून त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिली. तृप्ती देसाई मारहाणप्रकरणी संशयित आरोपी श्रीपूजक अ‍ॅड. केदार वसंत मुनिश्वर, श्रीश रामभाऊ मुनिश्वर, चैतन्य शेखर अष्टेकर, मयूर मुकुंद मुनिश्वर, निखिल शानभाग (सर्व रा. वांगी बोळ, महाद्वार रोड), राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किसन मुरलीधर कल्याणकर, जयकुमार रंगराव शिंदे (दोघे रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्ह्याची चाहूल लागताच श्रीपूजक व ‘राष्ट्रवादी’चे दोघे कार्यकर्ते शनिवारपासून पसार आहेत. त्यांनी मोबाईलही बंद ठेवले आहेत. पोलिसांनी सोमवारी त्यांच्या घरी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावली आहे. सीसीटीव्हीचे फुटेज पाहून आणखी काही नावे निष्पन्न होतील, त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाईल, असेही देशपांडे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी) कारवाई कराच : दीपा पाटीलकोल्हापूर : अंबाबाई मंदिरात तृप्ती देसाई यांनी येऊन गाभारा प्रवेश केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याबद्दल दीपा पाटील व वैशाली पाटील-महाडिक यांनी न्यायालयात कारवाई करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या, बुधवारी सुनावणी होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी बुधवारी (दि. १३) एप्रिलला अंबाबाई मंदिरात येऊन गाभारा प्रवेश केला. यावेळी मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याने त्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था बिघडविल्याबद्दल कारवाई करावी, असा मागणी अर्ज दीपा पाटील व वैशाली पाटील-महाडिक यांनी न्यायालयात दाखल केला होता. या अर्जावर विचार करून न्यायालय बुधवारी निर्णयाची शक्यता आहे.