शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सुमंत यांनी वैचारिक बहुजनवाद रुजविला

By admin | Updated: April 15, 2015 23:59 IST

अशोक चौसाळकर : भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे झाली शोकसभा

कोल्हापूर : महाराष्ट्रातील वैचारिक क्षेत्रात बहुजनवाद रुजविण्याचे काम डॉ. यशवंत सुमंत यांनी केले. त्यांचा बहुजनवाद हा महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांच्या समन्वयातून निर्माण झाला होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी बुधवारी येथे केले.पुरोगामी विचारवंत डॉ. यशवंत सुमंत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित शोकसभेत ते बोलत होते. बिंदू चौकातील रेड फ्लॅग बिल्डिंगमधील या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. विलास रणसुभे होते.डॉ. चौसाळकर म्हणाले, डॉ. सुमंत यांनी महाराष्ट्राला महात्मा गांधीजींची ओळख ‘बहुजनवादी गांधी’ म्हणून करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्म समजावून सांगताना त्यांनी जातींवर आधारित संघटना टिकणार नाहीत, हे आंबेडकर यांचे विचार पुराव्याने मांडले. शिवाय त्यांनी गांधीवाद्यांना आंबेडकरवाद, तर डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांना गांधीवाद समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार आपण पुढे नेले पाहिजेत, असे ते आवर्जून सांगत होते.प्रा. रणसुभे म्हणाले, राज्यशास्त्रातील स्त्रीवाद, पर्यावरणवाद, जागतिकीकरण हे लोकांना समजावून सांगण्याचा डॉ. सुमंत यांनी प्रयत्न केला. त्यांनी ‘महाराष्ट्रातील जातविषयक विचार’ या ग्रंथात राज्यातील जातीय राजकारणाचे अपुरेपण स्पष्ट केले. महाराष्ट्राला सैद्धान्तिक राजकारणावर विचार करण्याची सवय डॉ. सुमंत यांनी लावली. ते राजघराण्याशी संबंधित व्यक्ती असूनदेखील सामान्य व्यक्तीच्या राजकारणाबद्दल त्यांना आस्था, आदर होता. त्यांच्यासाठी न्याय मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले.सभेत मिलिंद यादव, शिवाजी शिंदे, बी. एल. बरगे, दिलीप पवार, सुभाष वाणी यांची भाषणे झाली. ‘भाकप’च्या शहर शाखेचे सचिव अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविकातून डॉ. सुमंत यांची डाव्या विचारांशी असलेली बांधीलकी स्पष्ट केली. जिल्हा सचिव एस. बी. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)