शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निपाणीच्या नगराध्यक्षपदी सुजाता कोकरे

By admin | Updated: December 8, 2015 00:39 IST

निवडणुक बिनविरोध : उपनगराध्यक्षपदी सुनील पाटील

निपाणी : येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षापदी सुजाता कोकरे, तर उपनगराध्यक्षपदी सुनील रामगोंडा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नम्रता कमते व उपनगराध्यक्ष बाळासाहेब देसाई-सरकार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक पार पडली. अध्यक्षपदासाठी सुजाता संजीव ऊर्फ किरण कोकरे, तर सुनील रामगोंडा पाटील यांचा उपनगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी एस. एस.बिरादार यांनी दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले.विश्वासराव शिंदे सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोकरे यांचे नाव मावळत्या नगराध्यक्षा नम्रता कमते यांनी, तर मावळते उपनगराध्यक्ष बाळासाहेब देसाई-सरकार यांनी सुनील पाटील यांचे नाव सुचविले.या निवडीनंतर आयुक्त आर. एम. कोडगे, नम्रता कमते, बाळासाहेब देसाई-सरकार, सभापती जुबेर बागवान व नगरसेवकांच्या हस्ते पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी नगरसेवक विलास गाडीवड्डर, राजेंद्र चव्हाण, दीपक माने यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक रवींद्र शिंदे, सभापती जुबेर बागवान, संजय सांगावकर, राज पठाण, प्रवीण भाटले- सडोलकर, रवींद्र चंद्रकुडे, नितीन साळुंखे, अनिस मुल्ला, धनाजी निर्मळे, दत्ता जोत्रे, सर्फराज कोल्हापुरे, मुन्ना काझी, विजय टवळे, दिलीप पठाडे, नगरसेविका पुष्पाताई कुंभार, भारती घोरपडे, सुषमा सडोलकर, उज्ज्वला पोळ, नजहतपरवीन मुजावर, लता शेटके, जायदा बडेघर, नीता लाटकर उपस्थित होत्या.निवडीनंतर नगराध्यक्ष सुजाता कोकरे, उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, कित्तूर राणी चन्नम्मा, महात्मा बसवेश्वर पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले. आमदार शशिकला जोल्ले, आमदार वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी यांच्या मार्गदर्शनातून आपली निवड झाली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू. शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे.सुजाता कोकरे,नूतन नगराध्यक्षा नेत्यांनी विश्वासाने सोपविलेली जबाबदारी पार पाडू. सर्व नेत्यांच्या विश्वासाला पात्र राहून शहरातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून अधिकाधिक विकासकामे राबवू. सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे.सुनील पाटील, उपनगराध्यक्ष