शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

हळदी येथे नवदाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: May 18, 2015 01:18 IST

किरकोळ वादातून कृत्य : पहिल्यांदा पत्नीची, नंतर पतीची नैराश्येतून आत्महत्या

सडोली खालसा : हळदी (ता. करवीर जि. कोल्हापूर) येथे नवदाम्पत्याने घरातील किरकोळ वादातून गळफास घेऊन आत्महत्या केली. महादेव शिवाजी जाधव-पाटील (वय २२) त्यांची पत्नी संगीता महादेव जाधव-पाटील (२०, सध्या राहणार हळदी, ता. करवीर, मूळ गाव भोसा, ता. जि. परभणी) अशी त्यांची नावे आहेत. संगीता हिने शुक्रवारी (दि. १५) रात्री राहत्या घरी, तर महादेव याने पत्नीच्या पाठोपाठ शनिवारी रात्री झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान संगीताच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू सासऱ्यासह पाच जणांविरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. महादेव जाधव-पाटील हे कापड व्यवसायानिमित्त दोन वर्षांपासून हळदी (ता. करवीर) येथे राहात होते. त्यांचे मूळ गाव परभणी तालुक्यातील भोसा असून त्यांचे हळदी येथे इंद्रायणी साडी सेंटर हे कापड दुकान आहे. महादेव यांचा धसाळी (ता. परभणी) येथील सोपान सांगोजीराव शेरकर यांची मुलगी संगीता हिच्याशी २७ फेब्रुवारी २०१५ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर हे दोघे पती-पत्नी व महादेव यांचा मावसभाऊ यांच्यासह हळदी येथे राहत होते. शुक्रवारी (दि. १५) रात्री नऊ वाजता पती-पत्नीत घरगुती कारणावरून वाद महादेव घरातून निघून गेला. त्याला शोधण्यासाठी संगीता व तिच्या मावस दिराने प्रयत्न केला; परंतु तो सापडला नाही. हे दोघे रात्री दहा वाजता घरी आले व पुन्हा संगीताचा मावसभाऊ महादेवला शोधण्यासाठी बाहेर पडला. यावेळी संगीताने घरातील सिलिंग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यादरम्यान महादेव घरी परतला. संगीता दार उघडत नाही म्हटल्यावर खिडकीची काच फोडून त्याने आत पाहिले असता फॅनला संगीता लटकत असलेली दिसली. त्यावेळी तिथून निघून गेलेल्या महादेवने शनिवारी (दि. १६) त्यानेही हळदी-सडोली दरम्यानच्या पुलाशेजारील करंजीच्या झाडास स्वत:च्या शर्टाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.