शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साखर कारखाने अभूतपूर्व संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:34 IST

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशातील साखरेच्या उत्पादनाची वाटचाल विक्रमी ३१५ लाख टनांकडे सुरू आहे. याचवेळी साखरेच्या दरातील घसरणही चालूच असून ते प्रति क्विंटल २ हजार ५२५ ते २६०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी बँकेने गुरुवारी साखरेच्या मूल्यांकनात सव्वाशे रुपयांची कपात करत ते २ हजार ५९० ...

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशातील साखरेच्या उत्पादनाची वाटचाल विक्रमी ३१५ लाख टनांकडे सुरू आहे. याचवेळी साखरेच्या दरातील घसरणही चालूच असून ते प्रति क्विंटल २ हजार ५२५ ते २६०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी बँकेने गुरुवारी साखरेच्या मूल्यांकनात सव्वाशे रुपयांची कपात करत ते २ हजार ५९० रुपयांवर आणले. यामुळे साखर कारखानदारी अभूतपूर्व संकटात सापडली आहे.देशांतर्गत साखरेची मागणी २५० लाख टन असल्याने ६५ लाख टन साखर अतिरिक्त होणार आहे. बाजारातील मागणीपेक्षा पुरवठा जादा झाल्याने साखरेचे दर २५२५ रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. या दरात साखरेचा उत्पादन खर्चही निघत नाही. एफआरपी देणेही मुश्कील बनले आहे. सुमारे १८ ते २० हजार कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. ज्या साखर कारखान्यांनी ३१००, २८०० रुपयेप्रमाणे बँकेकडून उचल घेतली आहे, त्यांनी सध्याच्या दराप्रमाणे साखर विकली तरी बँकेची उचल भागवण्यासाठी पैसे कमी पडतात. हे पैसे कुठून द्यायचे तसेच कामगारांचा पगार आणि कारखान्यांचा इतर खर्च कसा भागवायचा? असा प्रश्न कारखानदारांसमोर उभा राहिला आहे.केंद्राने २० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर दोन हजार प्रति क्विंटलवर आले आहेत. या दराने निर्यात करणे तोट्याचे आहे. त्यामुळे कारखानदार केंद्राच्या मदतीची वाट पाहत आहेत. अतिरिक्त साखरेची निर्यात झाली तरच साखरेचे दर वाढतील. त्यामुळे कारखान्यांनी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता साखर निर्यात करणे आवश्यक आहे, अन्यथा परिस्थिती आणखीनच गंभीर होणार आहे.मूल्यांकनात महिन्यात चौथ्यांदा कपातदर घसरतील तसे राज्य सहकारी बँक साखर मूल्यांकनात कपात करत आहे. या महिन्यात गुरुवारी चौथ्यांदा कपात करण्यात आली. ३१ मार्चला ३१०० रुपये असलेले मूल्यांकन ३ एप्रिलला २९२० रुपये, तर १० एप्रिलला २८०० रुपयांवर आणण्यात आले. १७ एप्रिल रोजी त्यात आणखी कपात करून ते २७०० रुपयांवर आणण्यात आले होते. गुरुवारी यात १२५ रुपये कपात करून ते २५७५ रुपये प्रति क्विंटल केले. यामुळे कारखान्यांना आता बँकेकडून प्रति क्विंटल २१९० रुपये उचल मिळणार आहे.केंद्राचा मदतीचा निर्णय पुढील आठवड्यातअतिरिक्त साखरेची निर्यात करता यावी तसेच साखर कारखानदारीला मदत व्हावी यासाठी केंद्राने साखरेच्या विक्रीवर उपकर लावण्यासह विविध पर्यायांवर विचार करत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत (पुढील आठवड्यात) याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.