शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीसंदर्भात अहवाल सादर करा

By admin | Updated: May 13, 2016 01:05 IST

मुख्यमंत्र्यांचे आदेश : चंद्रकांतदादांशी चर्चा; निर्णयाच्या दिशेने एक पाऊल पुढे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीसंदर्भात नगरविकास विभागाने तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शहराच्या हद्दवाढीसंदर्भात चर्चा केली, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. सरकारच्या या भूमिकेमुळे शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले. महानगरपालिकेच्या हद्दवाढीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही मागणी करण्यात येत आहे. शहरात सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समिती स्थापन होऊन त्यांच्यामार्फत हद्दवाढीसाठी आंदोलन होत आहे. गेल्याच आठवड्यात सर्वपक्षीय कृती समितीची बैठक घेऊन याबाबत सरकार सकारात्मक आहे; परंतु नेमकी कशाप्रकारे हद्दवाढ करावी, त्यामध्ये कोणकोणती गावे असावीत, याकरिता तज्ज्ञ शासकीय अधिकाऱ्यांच्या पाहणी व अभ्यासानंतर निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी मुंबईत मंत्रालयात पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेऊन या मागणीवर ठोस निर्णय होण्याच्या दृष्टीने लक्ष घालण्याची विनंती केली.कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना सन १९४४ मध्ये झाली व त्यानंतर सन १९७२ मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली. मात्र, सन १९४४ ते १९७२ या कालावधीत व त्यानंतरदेखील एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. नागरिकांच्या आग्रही मागणीनंतर अनेकदा याबाबत निर्णय घेण्यासाठी आश्वासने देऊन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या; परंतु कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असेही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी) दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समितीनगरविकास विभागातील दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची एक समिती नेमून त्यामार्फत अभ्यासपूर्ण अहवाल मागवून घ्यावा आणि त्यानंतर हद्दवाढीवर निर्णय घ्यावा, अशी सूचनाही पाटील यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती तत्काळ मान्य केली. पालकमंत्री पाटील यांच्या भूमिकेमुळे शहराची हद्दवाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट झाले.