शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

‘वारणा’बाबत जनहित याचिका दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:01 IST

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या आज, सोमवारी होणाऱ्या विशेष सभेत वारणा नळ योजनेसंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा क्रांतिकारक ...

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या आज, सोमवारी होणाऱ्या विशेष सभेत वारणा नळ योजनेसंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा क्रांतिकारक ठराव करावा, असे आवाहन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले. याचिका दाखल झाल्यास कुठले दानोळीकर आणि कुठले पुढारी सर्वांच्याच कुरघोड्या बंद होतील, असा टोला देत वारणा योजनेच्या मंजुरीपासून काहीजणांनी टीका केली, तर काहीजणांनी पाण्यात राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इचलकरंजीकरांनी संयमाची भूमिका घेतली, असेही ते म्हणाले.येथील नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महिला महोत्सवास रविवारपासून प्रारंभ झाला. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.हाळवणकर म्हणाले, इचलकरंजी शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पुढील ४० ते ५० वर्षे पाणी पुरावे, यासाठी शासनाने वारणा योजना मंजूर केली. मात्र, काहीजणांनी टीका करीत, तर काहीजणांनी राजकारण सुरू केल्याने नदीकाठच्या गावांतून विरोध सुरू झाला. इचलकरंजीवासीयांनी संयमाची भूमिका घेतली. तरीही त्यांचा विरोध कायम आहे. याचा विचार करून सभेमध्ये याचिका दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. त्यासाठी राजकारण पाहिजे, की पाणी पाहिजे, याचा विचार करावा. कारण प्रत्येक गोष्टीत टीका केली जाते. इंदिरा गांधी रुग्णालयाच्या हस्तांतरणावर टीका झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना बंद अवस्थेत असल्याची टीका झाली. काही महत्त्वाच्या गोष्टीत राजकारण बाजूला ठेवण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, नगराध्यक्षा अलका स्वामी, महिला व बालकल्याण समिती सभापती राजेशकंवर राठोड, आरोग्य सभापती संगीता आलासे, संध्या बनसोडे, अजित जाधव, अशोक जांभळे, मदन झोरे, मालिकेतील कलाकार दीपाली मुचरीकर, गार्गीसिंह उदावत, आदी उपस्थित होते. यावेळी मोनिका जाजू यांनी सूत्रसंचालन केले.युतीमुळे माने वहिनींमध्ये परिवर्तनकार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना माजी खासदार निवेदिता माने यांनी आमदार हाळवणकर व नगराध्यक्षा स्वामी यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. त्यावेळी उपस्थितांत युती झाल्याने कौतुक सुरू असल्याची कुजबुज सुरू होती. तोच धागा पकडून आमदार हाळवणकर यांनी शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे माने वहिनींच्यात परिवर्तन झाल्याचा टोला दिला. त्यामुळे सभागृहात जोरदार हशा पिकला.