शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘आयजीएम’बाबत प्रतिज्ञापत्र सादर करा

By admin | Updated: November 19, 2014 23:21 IST

मुंबई खंडपीठाने दिले आदेश

इचलकरंजी : येथील इंदिरा गांधी मेमोरिअल हॉस्पिटल कार्यक्षमपणे चालविण्यास इचलकरंजी नगरपरिषद सक्षम नसल्याचे निरीक्षण नोंदवत राज्य शासन व इचलकरंजी नगरपरिषदेने चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आदेश मुंबई खंडपीठाने दिला. ‘आयजीएम’ राज्य शासनाने ताब्यात घ्यावे व सक्षमीकरणासाठी कारभाराची चौकशी करावी, या मागणीची याचिका सामाजिक कार्यकर्ते उमेश खांडेकर व दत्ता पाटील यांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत दाखल केली होती. त्यावर आज, बुधवारी मुख्य न्यायाधीश मोहित शहा व बी. पी. कुलाबवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी हा आदेश देण्यात आला.इचलकरंजीत नगरपालिकेच्यावतीने चालवले जाणारे ३५० खाटांचे आयजीएम हॉस्पिटल आहे. मात्र, हे हॉस्पिटल सक्षमपणे चालविण्यासाठी पालिका सक्षम नाही. आयजीएममध्ये शासनाकडून येणाऱ्या विविध आरोग्य योजना राबविल्या जात नाहीत. येथील अनेक विभाग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी बंद आहे. विविध आजारांवरची औषधेही वेळोवेळी उपलब्ध होत नाहीत. पालिकेकडे याबाबत आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे या हॉस्पिटलच्या सक्षमीकरणासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी व आयजीएमच्या कारभाराची चौकशी होऊन शिफारशी मागवून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य शासनास द्यावेत. तसेच आयजीएमचा कारभार तत्काळ राज्य शासनाने ताब्यात घेऊन सक्षम व अद्ययावत करावे, अशी विनंतीही याचिकेत केली आहे. याचिकेत राज्य शासन, नगरपरिषद प्रशासन संचालक, जिल्हाधिकारी कोल्हापूर, नगरपरिषद इचलकरंजी, तसेच आयजीएम हॉस्पिटल प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)