शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या अधीन राहून विवेकाचा लढा : दाभोलकर

By admin | Updated: August 14, 2016 00:59 IST

युवा संकल्प परिषद : दाभोलकरांचा मारेकरी न सापडल्याने संताप

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण होत आली तरी अजून मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. कार्यकर्त्यांच्या मनात संतापाची भावना मनात असतानाही अहिंसक मार्गाने संविधानाच्या अधीन राहून विवेकाच्या मार्गाने लढा सुरूच ठेवू, असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शिवाजी विद्यापीठ व महावीर महाविद्यालयातर्फे शनिवारी आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन येथे आयोजित ‘जिल्हास्तरीय युवा संकल्प’ परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘अंनिस’चे कपिल मुळे, सीमा पाटील, संजय बनसोडे, राज्य कार्यवाह सुनील स्वामी, सचिव निशांत शिंदे उपस्थित होते.हिंसा रुजविण्याऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडून युवकांच्या मनात विवेकाचा विचार रुजविण्यासाठी राज्यभर युवा संकल्प परिषद घेण्यात येत आहे, असे दाभोलकर म्हणाले. तत्पूर्वी सकाळी परिषदेचे उद्घाटन ‘समाजकल्याण’चे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे अध्यक्षस्थानी होते. महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, रमेश वडणगेकर उपस्थित होते. यावेळी लोंढे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. प्राचार्य लवटे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. (प्रतिनिधी)‘विवेकवाहिनी’त सहभागी व्हा समाजात विवेकी विचार रुजविण्यासाठी ‘अंनिस’तर्फे प्रत्येक महाविद्यालयात ‘विवेकवाहिनी’ सुरू केली असून, विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. दाभोलकर यांनी केले. हिंसेला नकार देत मानवतेचा स्वीकार करीत विकासप्रवाहात जोडून घेण्याचे आवाहन त्यांनी केलेपंतप्रधानांना काळी पत्रे पाठविणारडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दि. २० आॅगस्ट रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तपासयंत्रणेला त्यांचे मारेकरी अजूनही सापडले नाहीत. याचा निषेध म्हणून ‘अंनिस’च्या प्रत्येक गावातील शाखेतर्फे पंतप्रधानांना काळ्या कागदावर लिहिलेली पत्रे पाठविणार आहोत, असे डॉक्टर दाभोलकर म्हणाले.