शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांत आज रंगणार ‘शब्दांचे वॉर’

By admin | Updated: February 13, 2015 00:44 IST

‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे स्पर्धा : सदस्यता नोंदणीचा फुटणार ‘लकी ड्रॉ’

कोल्हापूर : निवडणुकांच्या जाहीर प्रचारापासून ते सामाजिक कार्यापर्यंत, एखाद्या विषयावर वादविवादापासून खिल्ली उडविण्यापर्यंत असा माहितीचा खजिना क्षणात आपल्या पर्यंत पोहोचवणारे प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाला पसंती दिली जाते. तरुणार्ईची याला प्रचंड पसंती आहे. आणि म्हणूनच या सोशल मीडियाविषयी तरुणाईच्या भावना जाणून घेण्यासाठी ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे आज, शुक्रवारी ‘वॉर आॅफ दि वर्डस’ ही डिबेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ‘युवा नेक्स्ट’च्या सदस्यता नोंदणीचे लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. आपण व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, वुई चॅट अशा अनेक माध्यमांतून जोडले जाताना त्याचे फायदे पाहतो. मात्र, त्यासोबत त्याचे धोकेही तितकेच गंभीर आहेत. तरुणांमध्ये त्याविषयी मतमतांतरे होते. या चर्चेला व्यासपीठ मिळण्यासाठी कदमवाडीतील ‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट’ या महाविद्यालयात दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत ‘वॉर आॅफ दि वर्डस’ ही डिबेट ही स्पर्धा होणार आहे. यात विद्यार्थ्यांनी ‘सोशल नेटवर्किंग आयुष्याचा अविभाज्य घटक बनत चालला आहे का?’ या विषयावर मते मांडायची आहेत. स्पर्धेला नेटसॉफ्ट टेक्नॉलॉजीस यांचे प्रायोजकत्व व भारती विद्यापीठ शिक्षण संस्थेचे सहकार्य लाभले आहे.दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजता ‘युवा नेक्स्ट २०१४-१५’ या वर्षातील सदस्यता नोंदणीचे लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. यात विजेत्या विद्यार्थ्यांना पार्थ आॅप्टिक्सतर्फे गॉगल्स, साई स्पोर्टस्तर्फे ट्रॅकसुट व बॉक्स आॅफिस रेंट अ‍ॅँड सेलच्यावतीने गिफ्ट व्हाउचर्स देण्यात येणार आहेत. प्रायोजक नेटसॉफ्ट टेक्नॉलॉजीस ही संस्था गेली १४ वर्षे राजारामपुरी येथे कार्यरत असून, येथे नामवंत कंपन्यांचे सर्टिफि केट कोर्सेस शिकविले जातात. ‘व्हीयूई’ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे परीक्षा केंद्रही येथे आहे. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा व माहितीसाठी सचिन : ९७६७२६४८८५ व ०२३१-२६४१७०७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या युवा नेक्स्टच्या सदस्यांनी सोबत युवा नेक्स्टचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे अन्यथा फी आकारली जाईल. अन्य विद्यार्थ्यांना ३० रुपये प्रवेश फी भरावी लागेल. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे रुपये पंधराशे, एक हजार व पाचशे रुपये रोख बक्षीस व सन्मानचिन्ह दिले जाईल.