शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमुळे बीएडचे विद्यार्थी गोंधळले

By admin | Updated: April 21, 2015 00:33 IST

बी.एड. शाखेच्या परीक्षेत सोमवारी दुसऱ्याच विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने विद्यार्थी गोेंधळले होते.

भोंगळ कारभार : आठ केंद्रांवर ८६९ विद्यार्थीअमरावती : बी.एड. शाखेच्या परीक्षेत सोमवारी दुसऱ्याच विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने विद्यार्थी गोेंधळले होते. जिल्ह्यातील आठ केंद्रांवर ८६९ विद्यार्थी पहिल्या पेपरपासून वंचित राहिले. चुकीच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्याने पुन्हा एकदा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अमरावती विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयातील बी.एड. शाखेच्या परीक्षा २० एप्रिल ते ७ मे पर्यंत घेण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता उद्योनमुखी भारतीय समाजातील शिक्षक आणि शिक्षण विषयाचा पेपर होता. त्याकरिता विविध केंद्रावर ८.४५ वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आली. मात्र, काही वेळातच प्रश्नपत्रिका २३ एप्रिल रोजीच्या शैक्षणिक मानस शास्त्राचा असल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. वर्ग खोलीत बसलेले विद्यार्थी एकमेकांकडे विचारणा करुन लागले होते. तत्काळ ही बाब काही विद्यार्थ्यांनी केंद्र प्रमुखांच्या लक्षात आणून दिली. त्यांनीही तत्काळ पेपरचे लिफाफे तपासले असता त्यावरही दोन्ही विषय नमूद असल्याचे आढळून आले. त्यामुळे केंद्र प्रमुखांनी तत्काळ विद्यापीठाशी संपर्क केला होता. चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे सर्व विद्यार्थ्यांनी पेपर न सोडविता वर्ग खोल्यांतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्याने एकच गोंधळ उडाला. शहरातील डिग्री कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशन व विमलाबाई देशमुख महाविद्यालयातील दोन्ही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाल्याचे दिसून आले.