शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

विद्यार्थिनी उपस्थित भत्त्याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 26, 2014 23:45 IST

सव्वा पाच हजार मुली : पहिली ते चौथीसाठी प्रतिदिन एक रुपया; गळती थांबवण्यासाठी प्रयत्न

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -दारिद्र्यरेषेखालील खुल्या गटातील आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी ‘उपस्थित भत्त्या’च्या प्रतीक्षेत आहेत. निम्मे शैक्षणिक वर्ष सरले तरी जिल्ह्यातील सुमारे ५ हजार २८० मुलींना भत्ता मिळालेला नाही. या मुलींना प्रतिदिन एक रुपयाप्रमाणे ‘उपस्थित भत्ता’मिळतो.नियमित शाळेला उपस्थित राहण्याची सवय लागावी, मागास व दुर्बल घटकांतील मुलीही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात याव्यात, म्हणून शासनाच्या शिक्षण विभागाकडून गेल्या दहा वर्षांपासून उपस्थित भत्ता दिला जातो. प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथी इयत्तेत शिकणाऱ्या गरीब, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील मुली प्रत्येक दिवसाला एक रुपयाच्या प्रोत्साहनपर भत्त्यासाठी पात्र आहेत. यासाठी विद्यार्थीनींनी वर्गात ७५ टक्केपेक्षा अधिक उपस्थित असणे बंधनकारक आहे.दारिद्र्यामुळे पालक शिक्षण घेण्याच्या वयातच मुलांना कामाला जुंपतात. परिणामी, मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अनेक मुले वारंवार गैरहजर राहिल्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. यामुळे पालकांना अल्प प्रमाणात का असेना, आर्थिक हातभार लागावा, गळती थांबून मुली रोज शाळेला येण्याची गोडी लागावी म्हणून भत्ता दिला जातो.प्रत्येक महिन्याच्या शेवटी भत्ता मिळावा, अशी पालकांची मागणी आहे. मात्र, शासन भत्त्याची रक्कम जिल्हा पातळीवर वेळेत पाठवित नाही. शिक्षण विभागाकडून पाठपुरावा केला तरी गांभीर्याने घेतले जात नाही. तसेच वेळेत भत्ता मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींकडून ठोस पाठपुरावा होत नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी भत्ता मिळण्यास विलंबच होत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, त्यांनतर सत्तेवर आलेले भारतीय जनता पक्षाचे नवे सरकार या प्रमुख कारणांमुळे भत्त्यासाठी यंदा अधिकच विलंब झाला आहे.निम्मे शैक्षणिक वर्ष संपले तरी जिल्हा पातळीवरील शिक्षण प्रशासनाला भत्त्याची रक्कम कधी मिळणार, याची अजून तरी नेमकेपणाने माहिती नाही. मुलींचे पालक संंबंधित शाळेतील मुख्याध्यापकांकडे चौकशी करीत आहेत. मुख्याध्यापकही शासनाकडे बोट दाखवत, शासनाकडून आल्यानंतर भत्ता दिला जाईल, असे मोघम उत्तर देत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून भत्ता त्वरित द्यावा, अशी मागणी होत आहे. तालुकानिहाय पात्र मुली आजरा-१६५, गगनबावडा-४४, भुदरगड-२११, चंदगड-२३३, गडहिंग्लज-३७१, हातकणंगले-१२३३, कागल-२५९, करवीर-७७४, पन्हाळा-३३२, राधानगरी-४२०, शाहूवाडी-४२८,शिरोळ-८१३.भत्ता म्हणून जिल्ह्यासाठी सुमारे साडेचार लाखाची आवश्यकता आहे. जिल्हा नियोजन विभागामार्फत पैसे शिक्षण विभागाकडे येतात. निधीची प्रतीक्षा आहे.- ए. जी. मगदूम, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी