तेजस पाटोळे हा सोमवारी सकाळी गाडी धुण्यासाठी कृष्णा नदी काठावरील मळी शेतामध्ये गेला होता. नदीतून बादलीच्या साहाय्याने पाणी आणताना पाय घसरून तो पाण्यात पडला; परंतु काही काळ शेतातील नागरिकांना गाडी धुवत असलेला तेजस न दिसल्यामुळे त्यांनी नदीकडे धाव घेतली. तो पाण्यात बुडाल्याची शंका आल्याने ग्रामस्थांनी आरडाओरड केली. ही माहिती समजताच गावातील नागरिक नदीकाठी जमा झाले. नदीत त्याचा शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह आढळून आला. पोलीस पाटील सरदार चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. याबाबतची वर्दी सागर पाटोळे यांनी दिली. या घटनेने चिंचवाड गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, लहान भाऊ, चुलते असा परिवार आहे.
फोटो - १४१२२०२०-जेएवाय-०२-मृत तेजस पाटोळे