शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

विद्यार्थी मंडळ निवडणुकीला गालबोट

By admin | Updated: August 15, 2014 00:23 IST

शिवाजी विद्यापीठ : अधिकाऱ्यांना धारेवर; निवडणूक रद्दची मागणी

कोल्हापूर : मतदारयादीनुसार अर्जात नावाची नोंद न केल्याने अर्ज बाद केल्याबद्दल तसेच मतदारांना आवाहन करताना विद्यार्थी संघटनेचा, त्यांच्या पदधिकाऱ्यांचा उल्लेख केल्याच्या कारणावरून अपमान केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी सेना आणि आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्या (एआयवायएफ) कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना आज, गुरुवारी धारेवर धरले.शिवाजी विद्यापीठ अधिविभाग विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीनंतर तब्बल दोन तास संबंधित कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांत वाद रंगला. ही निवडणूक रद्द करून पुन्हा घ्यावी, अशी लेखी मागणी या संघटनांनी विद्यापीठाकडे केली.निवडणुकीत सचिवपदासाठी दाखल झालेल्या पाच अर्जापैकी दोन अर्ज अवैध ठरले. त्यात प्रियांका जाधवने तिला दिलेल्या मतदार यादीनुसार अर्जात स्वत:चे नाव नोंद करताना ‘श्रीमती’ असा उल्लेख केल्याबद्दल अर्ज अवैध ठरला. तसेच निवडणूक लढविलेल्या अश्विनी नाईकने मतदारांना आवाहन करताना संघटनेचा, पदधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केल्यावर कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांनी तिला मध्येच थांबविले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ‘एआयवायएफ’चे गिरीष फोंडे, अश्विनी नाईक, शिवाजी माळी यांनी, तर प्रियांका जाधवचा अर्ज जाणीवपूर्वक बाद केल्याचा आरोप केला. ‘राष्ट्रवादी विद्यार्थी’चे शहराध्यक्ष अवधूत अपराध, प्रियांका जाधव, सानिक मुतालिक आदींनी कुलगुरूंकडे तक्रारीसाठी धाव घेतली. कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर डॉ. गायकवाड आणि विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाला. त्यानंतर प्रभारी कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या कक्षात सर्वांचा वाद दोन तास सुरू होता. यावेळी निवडणूक रद्दची मागणी केली. शिंदे यांनी मागणी कुलगुरूंपुढे ठेवण्यात येईल, असे सांगितल्यावर वाद थांबला. (प्रतिनिधी)