शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ताणतणाव व भविष्याबद्दलचा अंधार हीच आत्महत्येची कारणे, कोरोनाचे संकटही कारणीभूत : भावनिक विश्व समृद्ध करणे हाच उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:23 IST

कोल्हापूर : रोगाबद्दलचे भय, आर्थिक ताणतणाव व भविष्याबद्दलची चिंता ही मुख्यत: आत्महत्या करण्यामागील महत्त्वाची कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ...

कोल्हापूर : रोगाबद्दलचे भय, आर्थिक ताणतणाव व भविष्याबद्दलची चिंता ही मुख्यत: आत्महत्या करण्यामागील महत्त्वाची कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी गडमुडशिंगी येथे महिलेने मुलीसह, तर शुक्रवारी पन्हाळा तालुक्यातील कळेजवळील गोठे येथील दांपत्याने मुलासह नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनांनी समाजमन हादरले. मुलांसह आत्महत्या करण्याचे प्रमाण समाजात वाढले आहे. त्याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.

ज्येष्ठ समाज संवादक इंद्रजित देशमुख म्हणाले, लोकांचे भावनिक विश्व संपत येणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यावर जगभर संशोधन सुरू आहे. समाजातील तणावग्रस्तता विविध कारणांनी वाढली आहे आणि त्याचवेळेला आजूबाजूचे हक्काचे आधार खोकले झाले आहेत. त्यामुळे लोक मरणाला जवळ करत आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीत असुरक्षितता नव्हती. आता ढीगभर नातलग असूनही कुणाचा आधार वाटत नाही. बाईला बाप असतो तोपर्यंत माहेर हक्काचे असते. भावाच्या राज्यात ते उपकाराचे होते. त्यामुळे स्वाभिमानी बाई कधीच वडील गेल्यानंतर माहेरकडे हात पसरायला जात नाही. अशा अनेक कारणांनी एकाकीपण वाढत आहे. त्यामुळे संकटाला सामोरे जाण्याऐवजी लोक मृत्यूला जवळ करत आहेत ते फारच हादरवून सोडणारे आहे.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कावेरी चौगले म्हणाल्या, कोविडमुळे संपलेला रोजगार, त्यातून आलेली आर्थिक अस्वस्थता, यातून आपल्या जीवनात भविष्यात काही चांगले घडेल असा आशावाद संपुष्टात येणे या सगळ्याचा परिणाम म्हणून सामूहिक आत्महत्या होत आहेत. या आत्महत्यांची कारणे सामाजिकच आहेत. ताण एकट्यापुरताच मर्यादित असतो तेव्हा व्यक्ती आपले जीवन संपवते; परंतु आपण भविष्यात कुटुंबाचा सांभाळ चांगल्या पद्धतीने करू शकतो हा विश्वास संपून जातो तेव्हा कुटुंबासह आत्महत्या करण्याची प्रवृत्ती बळावते. अशा पद्धतीने आत्महत्या करण्याचा निर्णयही कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषाचाच असतो.

कशा रोखता येतील या घटना..

१.आर्थिक अडचण, कौटुंबिक मालमत्तेतील वादात झालेली फसवणूक, वेगवेगळ्या कारणांनी समाजात, कुटुंबात होणारी मानहानी अशी वरकरणी न दिसणारी अनेक कारणे या घटनांच्या तळाशी असतात. त्यांचा वेळीच शोध घेऊन संबंधित व्यक्तीचा ताण कमी केल्यास, त्याला आधार दिल्यास अशा घटना रोखता येतील.

२.एखादी व्यक्ती आत्ममग्न बनली आहे. समाजापासून तुटली आहे. जगण्यात रस नाही असे वर्तन करते तेव्हा वेळीच सावध होऊन तिच्याशी सतत बोलत राहिले पाहिजे, सकारात्मक ऊर्जा पेरत राहिले पाहिजे.

३.आत्महत्येचा विचार मनात आला की, लगेच तो आत्महत्या करत नाही. अनेक दिवस त्याच्या मनाच्या तळाशी तो विचार मुळे धरत असतो. त्या काळात त्याच्या वर्तणुकीतील नैराश्य हेरून मानसिक आधार देण्याचा प्रयत्न पत्नी, आईवडील, मुलांकडून झाला पाहिजे.