शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचा गुंता; मद्यविक्रेत्यांना चिंता

By admin | Updated: April 6, 2017 01:18 IST

नव्या ‘वाटा’ शोधण्याचे प्रयत्न : मालकी निश्चितीची प्रक्रिया आजपासून; प्रशासकीय पातळीवर गोंधळ

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्याने राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील मद्यविक्रीची दुकाने, परमिट रूम, बीअर शॉप सील झाली असली तरी न्यायालयीन निकालाच्या कक्षेत येणारे शहरातील ‘ते’ रस्ते नेमके कोणाचे हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग व कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सतावत आहे. त्यावर तोडगा म्हणून आता महापालिकेने रस्ते ताब्यात देण्याची मागणी करायची आणि तसा प्रस्ताव बांधकाम विभागाने राज्य शासनाला पाठवायचा, असे ठरल्याचे सांगण्यात आले. जसे रस्ते कोणाच्या मालकीचे हा वाद दोन कार्यालयांच्या अधिकाऱ्यांमध्ये रंगला होता, तसा तो महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांत रस्ता महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी कोणी प्रस्ताव तयार करायचा, असाही वाद रंगला आहे. शहर अभियंता कार्यालय आणि नगररचना विभाग यांनी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला; परंतु आयुक्त अभिजित चौधरी यांनी सक्त सूचना दिल्याने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व नगररचना सहायक संचालक धनंजय खोत आज, गुरुवारी एकत्र बसून प्रस्ताव तयार करणार आहेत. ‘पुढच्याला ठेच लागल्याशिवाय मागचा माणूस शहाणा होत नाही,’ याचा अनुभव शहरातून जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत आला आहे. या रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका प्रशासन करत आहे; परंतु कागदोपत्री ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावर दिसतात. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाहेर आला त्यानंतर काही दिवसांत बांधकाम विभागाने आपले हात झटकले आणि महापालिकेच्या ताब्यात रस्ते असल्याचा खुलासा केला; परंतु तशी रस्त्यांची कागदपत्रे शोधण्यात आपल्याकडे आहेत का याचा शोध मनपा अधिकाऱ्यांनी घेतला, पण त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. त्यामुळे आता दोन्ही यंत्रणा कार्यरत झाल्या असून रस्त्यांचे हस्तांतर महापालिकेकडे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मद्य विक्रेत्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहरातून जाणारे राज्य व राष्ट्रीय मार्गफुलेवाडी खांडसरी ते टेंबलाईवाडी-उचगाव.दसरा चौक-मिरजकर तिकटी, पाण्याचा खजिना ते कळंबा. पाचगाव ते फुलेवाडी रिंगरोड -खांडसरी.टोप एमआयडीसी पंचगंगा पूल- कसबा बावडा -ताराराणी चौक- शाहू नाका राष्ट्रीय महामार्ग - तावडे हॉटेल-ताराराणी चौक-व्हीनस कॉर्नर- दसरा चौक- शिवाजी पूल.