शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

थेट पाईपलाईनचे काम रोखले

By admin | Updated: January 13, 2016 01:24 IST

ठिकपुर्लीत ‘स्वाभिमानी’चे आंदोलन : शेतकऱ्यांना भरपाई द्या, ४४ गावांना पिण्याचे पाणी देण्याची मागणी

राशिवडे : ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथे सुरू असलेले थेट पाईपलाईनचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी बंद पाडले. राधानगरी तालुक्यातील धरणग्रस्तांचे पुर्नवसन, चर खुदाई करताना पडणारा भराव यांमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान, तर थेट पाईपलाईनला गळती लागल्यास शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? ‘थेब थेंब पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहू’, ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत दिडशेवर कार्यकर्त्यांनी थेट पाईपलाईनचे काम मंगळवारी दुपारी चार वाजता बंद पाडले. स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील, पंचायत समिती सदस्य अजित पोवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस जनार्दन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. प्रा. डॉ. जालंदर पाटील म्हणाले, शहराला शुद्ध पाणी पुरविण्याच्या विरोधात आम्ही नाही मात्र एकीकडे शहराला शुद्ध पाणी आणि खेड्यांना मैला, मळी मिश्रित पाणी का प्यायचे? ज्यांनी आपले संसार धरणात बुडविले त्यांचे पुर्नवसन अद्यापही झालेले नाही. त्यांच्यावर पुर्नवसनाचे भिजत घोंगडे शासन दरबारी असताना पुन्हा पाईपलाईनच्या चर खुदाईच्या कामामुळे पंधरा फूट उंच भरावा पडत आहे. शेतकऱ्यांनी आपली पिके रस्त्यावर आणायची कशी? पाईपलाईनला गळती लागून शेतकऱ्यांची जमीन नापिक होण्याची शक्यता आहे. त्याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित केले. अजित पोवार म्हणाले, राधानगरी पंचायत समितीने या थेट पाईपलाईन योजनेस विरोध करून ठराव महापालिकेकडे पाठविला होता. मात्र, या ठरावाला महानगरपालिकेने केराची टोपली दाखविली. राधानगरी तालुक्यांनी २६ गावे व करवीर तालुक्यांतील १८ गावांतून ही थेट पाईपलाईन जाणार असून, या गावांनाही या योजनेतून पिण्याचे पाणी मिळावे. शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप अनेक ठिकाणी फुटलेल्या आहेत. ज्यांच्या पाईप फुटलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीला महापालिकेने कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही. यावेळी जनार्दन पाटील वासुदेव पाटील यांची भाषणे झाली.या अंदोलनात भीमराव गोणुगडे, राधानगरी तालुका अध्यक्ष मालोजी जाधव, कागल तालुका अध्यक्ष, डॉ. बाळासाहेब पाटील, भुदरगड तालुका अध्यक्ष नितीन पोवार, शारदा कोईगडे, आण्णाप्पा चौगले, शरद मुसळे, तानाजी पाटील, शंकर पाटील, आण्णा खेबुडकर, शंकर पाटील, नीलेश महडेश्वर, आनंदा गारे, शिवाजी पाटील, शंकर कांबळे, शामराव टेपुगडे, डी. जी. चौगले, राजेंद्र पाटील, शंकर जाधव, विश्वास पाटील, सात्ताप्पा पाटील, संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. याची तीव्रता पाहून ठेकेदारांनी तत्काळ काम बंद करून, यंत्र सामुग्रीसह वाहणे अन्यत्र हलविली. न्याय मिळेपर्यंत काम सुरू करू नय,े अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला. (प्रतिनिधी)