शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

बुबनाळमध्ये विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

By admin | Updated: January 7, 2015 23:51 IST

अनियमित एस.टी. : विद्यार्थी आक्रमक; आश्वासनानंतर आंदोलन मागे

बुबनाळ : परीक्षेच्या तोंडावरच अनियमित एस.टी. बस येत असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आज, बुधवारी सकाळी कुमार विद्यामंदिर शाळेसमोर एस.टी. अडवून रास्ता रोको आंदोलन केले. घटनास्थळी आलेल्या आगार व्यवस्थापकास विद्यार्थ्यांनी धारेवर धरले. अखेर तीन तासांहून अधिक काळ झालेल्या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.बुबनाळ-आलास मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून सकाळी नऊ वाजेपर्यंतच तीन बसेस येतात. त्यानंतर रात्रीपर्यंत एकही बस नियमित येत नाही. रात्री मुक्कामाची बस येत नाही. ती सकाळी येते व उशिरा सुटते. याबाबत ग्रामपंचायतीने २२ नोव्हेंबर २०१४ रोजी राज्य परिवहन महामंडळ कोल्हापूर यांना लेखी पत्रव्यवहार करून प्रवाशाचे तसेच विशेष करून विद्यार्थ्यांचे होणारे हाल व नुकसानाबद्दल प्रत्यक्ष भेटून बससेवा सुरळीत नसलेबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी होणाऱ्या गैरसोयीवरून बस अडवून रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आश्वासने देवून ग्रामस्थांची बोळवण केली. त्यानंतर अनियमित बस सेवा सुरूच आहे. ऐन परीक्षेच्या काळात होणाऱ्या गैरसोयीबद्दल संतप्त विद्यार्थ्यांनी आज, बुधवारी सकाळी आठच्या सुमारस कुरुंदवाड आगाराची जयसिंगपूर-आलास बस रोखून धरली व रास्ता रोेको आंदोलन सुरू केले.दरम्यान, अचानक घडलेल्या आंदोलनामुळे वाहक व चालकांनी तत्काळ आगाराशी संपर्क साधून माहिती दिली. आगार व्यवस्थापक महादेव भंडारी व पट्टेकरी यांना विद्यार्थ्यांनी प्रश्नांचा भडिमार करून धारेवर धरले. यावेळी व्यवस्थापकांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.