शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या विमुक्त समाजातर्फे रास्ता रोको

By admin | Updated: April 1, 2015 00:33 IST

विविध मागण्यांकडे लक्ष : शासनाच्या विरोधात घोषणा, वाहतूक खोंळबली

कोल्हापूर : भटक्या विमुक्त समाजासाठी असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी भटका समाज मुक्ती आंदोलनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने व शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी माने, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विजय गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यशवंतराव चव्हाण योजनेतील तरतुदीनुसार वर्षाला २० कुटुंबांच्या तीन वसाहती करणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे चार वर्षांत १२ वसाहती निर्माण केल्या असत्या तर २४० कुटुंबांना हक्काची घरे मिळाली असती. मात्र, समाजकल्याण आणि जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे योजनेची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी अनेक गरीब भटक्या कुटुंबांना घरापासून वंचित राहावे लागले. त्याला समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी माने, समितीचे सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त गायकवाड जबाबदार आहेत. पारगांव (ता. हातकणंगले) येथील गोपाळ समाजातील गोपाळ समाजातील काही कुटुंबे घरासाठी पात्र आहेत. त्यांना त्वरीत जागा व घरे द्यावीत. टोप येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाजवळ गंगाराम नगर येथे कोणत्याही मूलभूत सुविधा नसलेल्या जागेत गोपाळ समाजातील २३ कुटुंंबे राहतात. या कुटुंबांना घरे मिळावीत यासाठी प्रस्ताव दिले आहेत. मात्र, ते प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. जाचक अट शिथील करून दाखले द्यावेत. निगवे दुमाला (ता. करवीर) येथे गोपाळ समाजाची ३२ कुटुंबे राहतात. शिरोली पुलाची येथील भूमीहिन २० कुटुंबे राहतात. वसगडे येथे गोपाळ, नंदीवाले समाजातील कुटुंबे आहेत. त्यातील प्रत्येक कुटुंबांला घरे द्यावीत. नागावातील गोपाळ समाजालाही जागा द्यावी आदी मागण्यांंकडे लक्ष वेधण्यासाठी येथील दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. त्यावेळी संतप्त कार्यकर्ते प्रवेशद्वार ढकलून आवारात घुसण्याचा प्रयत्न केले. पोलिसांनी थोपवून ठेवले. जोरदार निदर्शने करत रास्ता रोको केला. त्यामुळे पोलिसांनी पर्यायी रस्त्यांनी वाहतूक वळविली. निवासी जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन देऊन चर्चा केली. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव साठे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. रमेश चांदणे, भारत धोंगडे, विकास कांबळे, आदिनाथ साठे, युवराज पोवार आदी मोर्चात सहभागी झाले होते.चौक दुमदुमला‘निम का पत्ता कडवा हैं, सरकार साला भडवा हैं’, ‘एक रुपयाला कडिपत्ता, सरकार झाले बेपत्ता’, ‘निष्क्रिय राजाराम माने यांनी राजीनामा द्यावा’, ‘गलथान कारभार करणारे जिल्हा महसूल यंत्रणेचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.