शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमागधारकांचा रास्ता रोको

By admin | Updated: July 30, 2016 00:32 IST

इचलकरंजीत आंदोलन : वस्त्रोद्योगातीलमंदीकडे केंद्र, राज्य शासनाचे दुर्लक्ष

इचलकरंजी : वस्त्रोद्योगातीलमंदीकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी यंत्रमागधारकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासाभराच्या आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, आज, शनिवारी आंदोलनस्थळी आमदार सुरेश हाळवणकर हे सकाळी ११ वाजता भेट देणार असून, यावेळी यंत्रमागधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जीवन बरगे यांनी केले आहे.गेल्या वर्षीपासून वस्त्रोद्योगावर मंदीचे सावट पसरले आहे. याबाबत वेळोवेळी सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्याबरोबर विविध मार्गांनी आंदोलने करण्यात आली; परंतु सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. या संकटांमुळे यंत्रमाग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे. त्यामुळे यंत्रमाग व्यवसायाबद्दल शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ यंत्रमागधारकांनी तीन दिवसांपासून प्रांत कार्यालय चौकात धरणे आंदोलन सुरू केले आहे.शुक्रवारी तिसऱ्या दिवशी प्रांत कार्यालय चौकात ठिय्या मारत रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात जीवन बरगे, अमोद म्हेतर, रामचंद्र हावळ, जनार्दन चौगुले, रावसाहेब तिप्पे, बाळकृष्ण लवटे, सागर चाळके, अजित जाधव, अमृत भोसले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, यंत्रमागधारक सहभागी झाले होते.दरम्यान, आंदोलनस्थळी खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली. तसेच आंदोलन सुरू असताना आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता आमदार हाळवणकर यांनी वस्त्रोद्योगातील समस्यांबाबत सर्वच केंद्रात आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात आपण सोमवारी (दि. १ आॅगस्ट) अधिवेशनात लक्षवेधी मांडणार आहे. त्यावर मंगळवारी सभागृहात चर्चा होऊन यंत्रमागधारकांना व्याजात सवलत व सवलतीच्या दरात वीजपुरवठा हे मुद्दे प्रामुख्याने सोडविले जातील, असे आंदोलकांना सांगितले. (वार्ताहर)