शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दहा गावांचा पाणीपुरवढा होणार बंद

By admin | Updated: February 14, 2015 00:06 IST

जीवनप्राधीकरणची नोटीस : थकबाकीचा गांधीनगर, उजळाईवाडी, उचगांवसह इतर गावांना फटका

कोल्हापूर : गांधीनगरसह १३ गावच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनअंतगर्त गांधीनगर, वळीवडे, उजळाईवाडी, गोकुळ शिरगावसह दहा गावांना जीवनदायी ठरलेल्या योजनेचा पाणीपुरवठा मंगळवार (दि. १७)पासून बंद करण्यात येणार असल्याची नोटीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे शुक्रवारी देण्यात आली. या गावांना वारंवार सांगूनही त्यांनी थकबाकी न भरल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे या विभागाचे म्हणणे आहे. २००१ पासून गेली १३ वर्षे या योजनेतील दहा गावात पाणीपुरवढा सुरु आहे. दूधगंगा नदीतून स्वच्छ व नियमित पाणीपुरवढा होत असल्याने या परिसरात उपनगरांची झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे कनेक्शन धारकांची संख्याही मोठी आहे. जादा दर असूनही नियमित पाणीपट्टी भरत असल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगीतले. तरीही या योजनेतील दहा गावांची गेल्या अनेकवर्षापासूनची एकत्रित थकबाकी दोन कोटी ६९ लाख ५० हजार इतकी आहे. थकबाकी भरावी यासाठी प्राधिकरणाने या ग्रामपंचायतींना वारंवार सूचना दिल्या आहेत. परंतु, त्यांनी दखल न घेतल्याने जीवन प्राधिकरणने पाणीपुरवढा बंदचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्यास व अन्य ठिकाणाहून आणलेले पाणी पिऊन रोगराई झाल्यास त्यास प्राधिकरण जबाबदार नसल्याचेहीे या विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान पाणीपुरवढा बंद होणार असल्याची कुणकुण लागल्याने या परिसरातील नागरिकांचे धाबे दणाणले असून अनेकांनी नियमित पाणीपट्टी भरुनही थकबाकी कशी? असा सवाल करीत अनेकांनी संताप व्यक्त केला.गावनिहाय थकबाकीगांधीनगर : ३५ लाख ४१ हजारवळिवडे : ९ लाख ८० हजारगडमुडशिंगी : २९ लाख ४८ हजारउचगाव : १ कोटी २९ लाख ४६ हजारउजळाईवाडी : ५० लाख ६१ हजारगोकुळ शिरगाव : ५ लाख ६४ हजारतामगाव : २ लाख २७ हजारनेर्ली : १ लाख ६५ हजारकणेरी : ३ लाख ४६ हजारसरनोबतवाडी : २ लाख ६७ हजार