शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

टिंबर मार्केट परिसरात घरावर दगडफेक, दुचाकींची मोडतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:18 IST

कोल्हापूर : येथील टिंबर मार्केट परिसरात वाहनांमध्ये अवैधरीत्या गॅस भरणाऱ्या युवकांकडून स्थानिक नागरिकांवर हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ...

कोल्हापूर : येथील टिंबर मार्केट परिसरात वाहनांमध्ये अवैधरीत्या गॅस भरणाऱ्या युवकांकडून स्थानिक नागरिकांवर हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. पाचजणांनी जुन्या गुरांच्या बाजारातील काही घरांवर दगडफेक करून दारात लावलेल्या तीन दुचाकींची मोडतोड केली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी संशयितांवर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

संशयितांची नावे अशी : सौरभ भोसले, शुभम भोसले, सूरज वाघे, रोहित पाथरवट, अक्षय केसरकर (सर्व रा. टिंबर मार्केट).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टिंबर मार्केट परिसरातील जुन्या गुरांच्या बाजार परिसरातील महापालिकेच्या रिकाम्या जागेवर सौरभ भोसले आणि शुभम भोसले यांनी शेड बांधले आहे. या शेडमध्ये अवैधरीत्या वाहनांमध्ये गॅस भरला जातो, मद्य विक्रीदेखील केली जाते, असा नागरिकांनी आरोप केला आहे. रात्रीच्या वेळी येथे मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तींकडून परिसरात नेहमीच वादावादीचे प्रसंग घडत असल्याच्या तक्रारी आहेत.

शनिवारी रात्री सौरभ भोसले, शुभम भोसले, सूरज वाघे, रोहित पाथरवट, अक्षय केसरकर यांनी विनायक जाधव आणि संदीप जाधव यांच्यावर हल्ला केला. त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या इतर कुटुंबीयांवरही त्यांनी दगडफेक केली. तसेच रस्त्याकडेला उभारलेल्या तीन वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी राजवाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.