शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

झोपलेल्या फिरस्त्यावर दगडाने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:18 IST

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये मध्यरात्री एका लाॅटरी सेंटरच्या दारात झोपलेल्या फिरस्त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ...

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये मध्यरात्री एका लाॅटरी सेंटरच्या दारात झोपलेल्या फिरस्त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात उमेश बाळासाहेब सातपुते (वय ३०, फिरस्ता) हा जखमी झाला आहे. याबाबतची फिर्याद माया उमेश सातपुते (फिरस्ती) हिने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. त्यानुसार संशयित म्हणून गंगाराम हिरवे (फिरस्ता) याचे नाव निष्पन्न झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी मध्यरात्री संशयित व जखमी यांच्यात भंगार गोळा करण्याच्या कारणावरून वाद झाला होता. यातून जखमी सातपुते याला शिवीगाळ करत संशयित हिरवे याने जवळ पडलेला पाठासारखा वजनदार दगड घेऊन सातपुते याच्या डोक्यात प्रहार केला. यात सातपुते गंभीर जखमी झाला. याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ त्याठिकाणी येत जखमी सातपुते याला गंभीर अवस्थेत सेवा रुग्णालयात दाखल केले.

अनेक फिरस्त्यांचे आश्रयस्थान मार्केट

हे मार्केट दोन्ही बाजूनी मोकळे असल्याने अनेक वर्षे फिरस्त्यांचे आश्रयस्थान बनले आहे. येथे नशेमध्ये असलेल्या फिरस्त्यांमध्ये अनेकवेळा वादावादी आणि मारामारीही होते. त्यातूनच एका नशेत असलेल्या फिरस्त्याने दुसऱ्या फिरस्त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या फिरस्त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गाळेधारकांकडून होत आहे.