शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शालिनी सिनेटोनची जागा हेरिटेज ग्रेड तीनमध्ये समावेश करण्यास राज्य शासनाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST

कोल्हापूर : मराठी चित्रपट सृष्टीचा मानदंड असलेल्या शालिनी सिनेटोनच्या मोकळ्या जागेचा हेरिटेज ग्रेट ३ मध्ये समावेश करण्यास राज्य शासनाने ...

कोल्हापूर : मराठी चित्रपट सृष्टीचा मानदंड असलेल्या शालिनी सिनेटोनच्या मोकळ्या जागेचा हेरिटेज ग्रेट ३ मध्ये समावेश करण्यास राज्य शासनाने नकार दिला असून, याबाबतचा महापालिकेचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. महापालिका सभागृहात झालेला ठराव, शहरस्तरीय हेरिटेज कमिटीने घेतलेला निर्णय विरोधात असूनही ठेकेदाराला जागा मिळेल, असा निर्णय राज्य शासनाने घेतल्याबद्दल चित्रपट क्षेत्रात तीव्र नाराजी व्यक्त झाली.

एकेकाळी मराठी चित्रपट निर्मितीचे प्रमुख केंद्र बनलेला शालिनी सिनेटोन छत्रपती शाहू महाराज यांच्या कन्या आक्कासाहेब महाराज यांनी स्थापन केला. त्याकरिता ४७ एकर जागा उपलब्ध करून दिली होती. कालांतराने हा स्टुडिओ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी काही काळ चालविला. त्यानंतर तो मूळ मालक असलेल्या देवासच्या महाराजांकडे गेला. मराठी चित्रपटाचा पडता काळ सुरू झाला आणि शहराचे नागरीकरण वाढत जाईल तसे या स्टुडिओच्या जागेवर विकसनाचा विचार पुढे आला.

देवास महाराजांचे वटमुखत्यार घेतलेल्या ठेकेदार चांगदेव घुमेर यांनी महापालिकेकडे रीतसर अर्ज करून विकसन परवानगी मागितली होती. परंतु शालिनी सिनेटोनची इमारत असलेले दोन भूखंड स्टुडिओसाठी आरक्षित ठेवण्याच्या अटीवर बाकीच्या जागेवरील रेखांकनास मंजुरी देण्यात आली. तसेच प्रतिज्ञापत्रही घुमरे यांनी दिले होते. त्यामुळे स्टुडिओची जागा आरक्षित राहिली असे वाटत असतानाच पुन्हा गेल्या पाच-सहा वर्षांत घुमरे यांनी स्टुडिओची जागेवरील रेखांकनास परवानगी देण्याची विनंती राज्य सरकारकडे केली होती.

या जागेवर स्टुडिओचे आरक्षण ठेवण्याचा ठराव महापालिका सभेत झाला होता. शहरस्तरीय हेरिटेज कमिटीने ही जागा हेरिटेज ग्रेड ३ मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही राज्य शासनाने या जागेचा समावेश हेरिटेज ग्रेड ३ मध्ये समावेश करण्यास नकार देऊन विकसकांचे रेखांकन मंजूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे स्टुडिओची उरली-सुरली जागाही आता जाणार असल्याचे स्पष्ट झाले.

कोल्हापूरकर गप्प का?

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, खासदार संजय मंडलिक मंडळी असूनही आम्हा चित्रपट व्यावसायिकांना कोणी वाली नाही. मी खूप प्रयत्न केला; पण चित्रपट महामंडळ काहीच करत नाही. या ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी इच्छाशक्ती कोणाकडेच नाही. शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचा सगळ्या देशात आदर करतात, त्यांच्याच कोल्हापुरात हा ऐतिहासिक ठेवा नष्ट करताना कोल्हापूरकर का गप्प आहेत?

-सुरेखा शहा, अभिनेत्री

कोट -

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती कळविली आहे. परंतु स्टुडिओच्या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने सध्यातरी निकाल लागेपर्यंत विकासकाला रेखांकनाला परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही.

-आर. सी. महाजन, सहायक संचालक, नगररचना