शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णपालखीचे काम सुरु

By admin | Updated: August 10, 2015 01:09 IST

महाडिक यांच्या हस्ते प्रारंभ : तब्बल चाळीस किलो सोन्याची गरज

कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टतर्फे श्री अंबाबाईला सोन्याची पालखी देण्यासाठी सुरू झालेल्या मोहिमेला वेग आला आहे. पालखीसाठी सोन्यापासून मोर्चेल, चवऱ्या आणि आबदारी तयार करण्याचे काम वाय. पी. पोवारनगर येथे रविवारपासून सुरू झाले. श्रीयंत्र तयार करून या कामाची सुरुवात झाली. ट्रस्टचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते कामास प्रारंभ झाला. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी मोर्चेल, चवऱ्या आणि आबदारी देवीच्या पालखीस देण्यात येतील, अशी माहिती ट्रस्टचे कार्याध्यक्ष भरत ओसवाल यांनी दिली. आतापर्यंत ट्रस्टकडे साडेआठ किलो सोने जमा झाले आहे. देवीची पालखी मढविण्यासाठी चाळीस किलो सोन्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नवरात्र उत्सवापर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या सोन्याचा वापर करून मोर्चेल, आबदारी आणि चवऱ्या तयार करण्यात येणार आहे. वाय. पी. पोवारनगर येथील गणेश चव्हाण यांच्या वर्कशॉपमध्ये सुवर्णपालखीचे काम सुरू आहे. जसजसे सोने उपलब्ध होईल, तसतसे पालखीचे अन्य सुवर्णकाम करण्यात येईल, अशी माहितीही ओसवाल यांनी दिली. दरम्यान, सुवर्णसंकलनासाठी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टतर्फे दुसरा कक्ष रविवारी जुना राजवाडा पोलीस स्टेशनशेजारी सुरू करण्यात आला आहे. देवीची पालखी सोन्याने मढविण्यासाठी ट्रस्टतर्फे भाविकांकडून चोवीस कॅरेट सोने आणि रोख स्वरूपातील देणगी स्वीकारण्यात येत आहे. आॅनलाईन देणगीची सोयही कॅनरा, कॉसमॉस, स्टेट बँक आॅफ इंडिया आणि रत्नाकर बँकांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच मुंबई, दादर, डोंबिवली आणि ठाणे येथेही सुवर्ण संकलनासाठी देणगी केंदे्र स्थापन करण्यात येत आहेत. श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टमध्ये महालक्ष्मी बँकेचे संचालक भालचंद्र अष्टेकर, अंबाबाई पालखीचे हक्कदार बाळासाहेब जाधव यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. सुवर्णपालखी ट्रस्टच्या जुना राजवाडा येथील कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी सचिव महेंद्र इनामदार, के. रामाराव, जितेंद्र पाटील, निमंत्रित सदस्य सुरेश गायकवाड, नगरसेवक आर. डी. पाटील, श्रीपूजक शरद मुनीश्वर, महेश त्रिपाठी, राजाराम खाडे, त्यागराज शेट्टी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)