शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या हिमतीवर पैसे उभे करा

By admin | Updated: June 17, 2015 00:39 IST

राजू शेट्टी : जिल्हा बँकेतील ठेव कपातीस विरोध; ‘एफआरपी’साठी उपोषणाचा इशारा

गडहिंग्लज : मुळातच अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून ठेवी घेण्यास आपला ठाम विरोध आहे. राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा दुप्पट व्याजाचा भुर्दंड शेतकऱ्यांवर न टाकता स्वत:च्या हिमतीवर पैसे उभे करा आणि बँक चालवा, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी नामोल्लेख टाळून जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांना दिला.खासदार शेट्टी मंगळवारी सायंकाळी गडहिंग्लज दौऱ्यावर आले होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन एफआरपी, जिल्हा बँकेचा कारभार व ‘दौलत’विषयीची संघटनेची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.शेट्टी म्हणाले, राष्ट्रीयीकृत बँकेत दहा टक्के व्याजदराने विनाकपात पीककर्ज मिळते. मात्र, प्रचलित व्याजाबरोबरच संबंधित सेवा संस्था व जिल्हा बँकेच्या ठेव कपातीमुळे शेतकऱ्यांवर २१ टक्के व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. चार वर्षांपूर्वी यापेक्षाही अडचणीत असलेली बँक प्रशासकांनी सावरली. एका प्रशासकाला हे जमले, तर २२ संचालकांना हे का जमत नाही? बँकेवर नवीन संचालक मंडळ आल्यानंतर ३५० कोटींच्या ठेवी कमी झाल्या. यावरून ठेवीदारांचा संचालकांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट होेते. शेतकरी विरोधी संचालक मंडळ बरखास्त करून पुन्हा बँकेवर प्रशासकाची नेमणूक करावी.गेल्यावर्षी दोन शेतकऱ्यांचा बळी, हजारो आंदोलकांवर गुन्हे आणि साडेपाच कोटी भरपाईची नोटीस बजावून शासनाने साडेसहा हजार कोटीचे पॅकेज दिले. यावर्षी केवळ आमच्या दबावामुळे साडेअठराशे कोटींचे पॅकेज एफआरपीसाठी मिळाले आहे. तरीदेखील कारखानदार ही रक्कम देण्यास तयार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करावी. एफआरपी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करावी. २२ जूनपासून ‘एफआरपी’प्रश्नी साखर आयुक्तांच्या दारात आपण बेमुदत उपोषणाला बसणार आहोत. यासंबंधीचा निर्वाणीचा इशारा १९ जूनला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. आपणाला उपोषणाची संधी द्यायची की नाही? हे सरकारनेच ठरवावे, अशी टीप्पणीही शेट्टींनी केली. (प्रतिनिधी)‘दौलत’वर प्रशासक मंडळ नेमादौलत साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर शेतकऱ्यांचा विश्वास नाही. त्यांची मुदतदेखील संपलेली आहे. त्यामुळे कारखान्यावर प्रशासक मंडळ नेमून ठेवी जमा कराव्यात. बँकांची देणी भागवून शासकीय देणीसाठी मुदत घ्यावी. थकीत देणी उशिरा मिळाली तरी स्वीकारण्याची शेतकरी व कामगारांची तयारी आहे. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांची मालकी कायम ठेवून एक नवा प्रयोग म्हणून ‘दौलत’ पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न शासनाने करावा, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तसे झाल्यास ‘दौलत’ पुन्हा सुरू होऊ शकेल. तथापि, ‘दौलत’ विकण्याचा काही मंडळींचा डाव आहे, आम्ही तो विकू देणार नाही, असेही शेट्टींनी यावेळी स्पष्ट केले.