भरतीप्रक्रिया अनेक अडचणींमुळे रखडलेली आहे. त्यामुळे पूर्वीची पदे भरण्यासह नवीन पदे भरण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पवित्र पोर्टल अंतर्गत रखडलेली भरती प्रक्रिया सुरू करावी. वीस टक्के अनुदानपात्र शाळा आणि वीस टक्के अनुदान घेणाऱ्या ४० टक्के अनुदानासाठी पात्र शाळा दि. ४ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयामध्ये अनुकंपा एक हजार रुपये टोकन रक्कम दिली आहे. त्याप्रमाणे शासन निर्णयामध्ये निधी मिळण्याचे आदेश होणे आवश्यक आहे. त्यानुसार पात्र शाळांना त्वरित अनुदान देण्यात यावे. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठीचा आकृतिबंध ठरवण्याचा दि. ११ डिसेंबर रोजीचा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी आमदार आसगावकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
‘पवित्र पोर्टल’अंतर्गत रखडलेली भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST