शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणमध्ये लोकशाही दिनाच्या धर्तीवर कर्मचारी दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:22 IST

कोल्हापूर: जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी ज्याप्रमाणे लोकशाही दिन आहे, त्याच धर्तीवर कर्मचाऱ्यांचेही प्रश्न मार्गी लागावेत म्हणून राज्य सरकारने लोकशाही दिनाच्या ...

कोल्हापूर: जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी ज्याप्रमाणे लोकशाही दिन आहे, त्याच धर्तीवर कर्मचाऱ्यांचेही प्रश्न मार्गी लागावेत म्हणून राज्य सरकारने लोकशाही दिनाच्या धर्तीवर कर्मचारी दिन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजकल्याणमधून त्याची सुरुवात होत आहे. समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून राबविला जाणारा हा उपक्रम राबविणारा राज्यातील पहिलाच विभाग ठरला आहे. याच्या अंमलबजावणीचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

अधिकारी व कर्मचारी हे विविध प्रकारच्या योजना अंमलबजावणीचे काम करत असतात, मात्र कामाच्या व्यापात त्यांच्या स्वत:च्या सेवाविषयक प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. प्रश्न सुटत नसल्याने ते चिंतेत व तणावाखाली काम करताना दिसतात. याचा परिणाम प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर व गतिमानतेवर होत असतो. त्यामुळेच हे सेवाविषयक प्रश्न वेळेवर विशिष्ट कालमर्यादेत सुटण्याच्या गरजेतून कर्मचारी दिनाची संकल्पना पुढे आली.

राज्यातील सहायक आयुक्त कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचारी यांना त्यांचे प्रश्न जिल्हा, विभागीय स्तरावरील कर्मचारी दिनात उपस्थित करता येणार आहेत. सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या तक्रारींचा सुद्धा विचार होणार आहे. पहिल्या कर्मचारीदिनी उपस्थित झालेल्या तक्रारीचे उत्तर दुसऱ्या कर्मचारी दिनापूर्वी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यास देणे बंधनकारक आहे. कर्मचाऱ्यांचा प्रश्न आयुक्तालय स्तर किंवा शासन स्तरावर असला तरी, त्यासंबंधाची निवेदने स्वीकारून शासनास सादर करावी लागतील. प्रत्यक्ष उपस्थित न राहता व्हिडीओ कॉन्फरन्सने देखील सहभागी होता येणार आहे.

चौकट ०१

असे असेल कर्मचारी दिनाचे नियोजन...

दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी : जिल्हा व प्रादेशिक स्तर

दोन महिन्यातून एकदा दुसऱ्या गुरुवारी : प्रादेशिक स्तरावरील सर्व कार्यालये

तीन महिन्यातून एकदा तिसऱ्या गुरुवारी : राज्यस्तरीय आयुक्तालय स्तर

चौकट ०२

या प्रश्नांना असणार प्राधान्य...

अग्रिमे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, गोपनीय अहवाल, पदोन्नती, मानीव दिनांक, शिस्तभंगविषयक प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे, रजाविषयक प्रकरणे, हे विषय हाताळले जातील.