शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘सेंट झेवियर्स’च्या माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:27 IST

कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार करून त्यांचे प्राण वाचावेत, यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सेंट झेवियर्सचे माजी विद्यार्थी ...

कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार करून त्यांचे प्राण वाचावेत, यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सेंट झेवियर्सचे माजी विद्यार्थी आमदार ऋतुराज पाटील आणि त्यांच्या मित्र परिवाराने एकत्रित येत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २००५, २००६ आणि २००९ या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सुमारे साडेआठ लाख रुपये जमा केले. त्यातून नवीन अठरा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले. माजी विद्यार्थ्यांनी हे कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सेंट झेवियर्स हायस्कूलचे फादर प्रिन्सिपल जेम्स थोरात, सुपेरिअर फादर डेनिस बोर्जेस यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द केले. नैसर्गिक अडचणीच्याप्रसंगी सेंट झेवियर्सच्या आजी -माजी विद्यार्थ्यांकडून नेहमीच मदतीचा हातभार लावला जातो. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचा अभिमान वाटतो, असे फादर थोरात यांनी सांगितले. यावेळी रुझारीयो गोन्साल्विस, विल्सन डिसूझा, राजेंद्र कांडगावकर, राजेश चव्हाण, हर्षवर्धन पाटील, रोहित शिंदे, सत्यव्रत जामसांडेकर, आसिफ मुल्ला, रोहित शिकलगार, आदित्य नाईक, नीलेश सातवेकर, प्रणव वाणी, शिवा जाधव, रोहित नलवडे, वैभव सातवेकर, गौरव पाटील, आकाश परदेशी, आदी उपस्थित होते.

चौकट

यापुढेही मदत करू

कठीण प्रसंगी लोकांना मदत करण्याच्या सामाजिक बांधिलकीतून आम्ही सर्व मित्रांनी एकत्रित येत, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यापुढेही ज्या गोष्टींची गरज भासेल त्याची उपलब्धता करून मदत देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

फोटो (२४०५२०२१-कोल-माजी विद्यार्थी मदत) : कोल्हापुरातील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी १८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

===Photopath===

240521\24kol_14_24052021_5.jpg

===Caption===

फोटो (२४०५२०२१-कोल-माजी विद्यार्थी मदत) : कोल्हापुरातील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी  १८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.