शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

'लोकमत'च्या महारक्तदान अभियानास गडहिंग्लज विभागातही उस्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST

गडहिंग्लज : 'नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं' या 'लोकमत'च्या राज्यव्यापी महारक्तदान अभियानाला गडहिंग्लज विभागातही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. गडहिंग्लजसह आजरा ...

गडहिंग्लज : 'नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं' या 'लोकमत'च्या राज्यव्यापी महारक्तदान अभियानाला गडहिंग्लज विभागातही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. गडहिंग्लजसह आजरा व चंदगड तालुक्यातही या मोहिमेला विविध सामाजिक संस्था, संघटना,तरुण मंडळे आणि रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

गिजवणे येथील श्री विठ्ठल मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित गडहिंग्लज विभागातील पहिल्याच शिबिरात ५५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. 'संयुक्त शिवजयंती उत्सव समिती, गिजवणे आणि केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. त्यासाठी अर्पण रक्तकेंद्र, कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रारंभी 'लोकमत'चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे व छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्याचे पूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील व सरपंच पौर्णिमा कांबळे यांच्या हस्ते झाले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून शिबिराला सुरुवात झाली.

सतीश पाटील म्हणाले, कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा संकटाच्या काळात रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदान देण्याचा 'लोकमत'चा उपक्रम कौतुकास्पद आहे.

यावेळी उपसरपंच नितिन पाटील, ग्रामविकास अधिकारी डी.बी. कुंभार, महावीर पाटील, रमेश पाटील, लक्ष्मण शिंदे,

अमित देसाई, प्रभात साबळे, संतोष पाटील, अभिजित पोटजाळे, संजय पत्की, भूषण गायकवाड, अजित बुगडे,अमित चौगुले, अमित दळवी,

किरण पाटील,'लोकमत'चे वितरण व्यवस्थापक ओंकार कोठावळे, वितरण अधिकारी संग्राम पायमल व अवधूत पोळ, बातमीदार शिवानंद पाटील उपस्थित होते.

यावेळी 'लोकमत'चे सहाय्यक सरव्यवस्थापक(वितरण) संजय पाटील यांनी स्वागत केले. गडहिंग्लज विभागीय कार्यालय प्रमुख राम मगदूम यांनी प्रास्ताविकात अभियानाचा हेतू स्पष्ट केला. बाली चव्हाण यांनी आभार मानले.

----------------------

चौकट 'तिच्या' इच्छाशक्तीचे कौतुक! अनाहुतपणे शिबिरात आलेल्या

एका मुस्लीम महिलेने रक्तदानाची इच्छा व्यक्त केली. तिच्या रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याने तिला रक्तदान करता आले नाही.तरीदेखील उपस्थित सर्वांनी तिच्या इच्छाशक्तीचे विशेष

कौतुक केले.

----------

प्रतिक्रिया-१ ऐन कोरोना महामारीच्या काळात रक्ताच्या तुटवड्याचे अभूतपूर्व संकट राज्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे 'लोकमत'ने हाती घेतलेली मोहीम खरोखरच स्तुत्य आहे. यात सर्व सामाजिक संघटना व तरुण मंडळांनी सहभागी व्हावे.

- अमित देसाई, खजिनदार, जयभवानी तरुण मंडळ,गिजवणे.

प्रतिक्रिया-२

रक्ताला रक्त हाच पर्याय आहे. म्हणूनच 'लोकमत'च्या अभियानात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हायला हवे.

संतोष उर्फ पिंटू पाटील,

कार्यकर्ता,ओम ग्रुप,गिजवणे.

----------------

गिजवणे ( ता.गडहिंग्लज)येथे आयोजित महारक्तदान शिबिरात छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्याचे पूजन सरपंच पौर्णिमा कांबळे यांच्याहस्ते तर 'लोकमत'चे संस्थापक स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन

माजी जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी 'लोकमत'चे सहाय्यक सरव्यवस्थापक (वितरण) संजय पाटील,गडहिंग्लज विभागीय कार्यालय प्रमुख राम मगदूम, महावीर पाटील, रमेश पाटील, अमित देसाई, लक्ष्मण शिंदे, संतोष पाटील, संजय पत्की, प्रभात साबळे आदी उपस्थित होते.(संजय गायकवाड ) आयडेंटिटी फोटो -भगवा शर्ट-संतोष,निळा शर्ट - अमित

-------