शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत आज, उद्या भोगवटा प्रमाणपत्रासाठी विशेष कॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:26 IST

कोल्हापूर : शहरातील नागरिकांना भोगवटा प्रमाणपत्रे जलदगतीने मिळावीत, त्यांचा वेळ वाचावा या हेतूने महानगरपालिका नगररचना विभागामार्फत आज, गुरुवारी ...

कोल्हापूर : शहरातील नागरिकांना भोगवटा प्रमाणपत्रे जलदगतीने मिळावीत, त्यांचा वेळ वाचावा या हेतूने महानगरपालिका नगररचना विभागामार्फत आज, गुरुवारी व उद्या, शुक्रवारी भोगवटा प्रमाणपत्रासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

शासन निर्णयानुसार नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी, भोगवटा व विकास कामे मंजुरी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. यापूर्वी सादर करण्यात आलेली भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणे ऑफलाईन पद्धतीने देण्याचे कामकाज सुरू होते. त्यामुळे जी प्रकरणे दि. ५ मे पूर्वी ऑफलाईन पद्धतीने नगररचना विभागाकडे सादर झालेली आहेत. अशा प्रकरणांची भोगवट्याची कामे जलद गतीने करण्यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नगररचना विभागामध्ये विशेष कॅम्प आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी या प्रकरणामधील त्रुटींची पूर्तता करून सर्व प्रकरणे निकाली काढण्याबाबत निर्देश त्यांनी दिलेले आहेत. या अनुषंगाने नगररचना विभागामार्फत आज, गुरुवारी व उद्या शुक्रवारी कोविड नियमांचे पालन करून कार्यालयीन वेळेत ऑफलाईन भोगवटा परवानगीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधितांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगररचना विभागामार्फत करण्यात आले आहे.