कोल्हापूर : राज्यातील पोलीस भरतीतील दुसर्या टप्प्याला उद्या, शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. कसबा बावडा येथील पोलीस कवायत मैदानावर शारीरिक चाचणीला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील ३०३ जागांसाठी ११ हजार ७६ उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. दरम्यान, आज, गुरुवारी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी या ठिकाणी पाहणी केली. राज्यात सुमारे १२ हजार पोलीस भरती होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भविष्यात तीन पोलीस ठाणी होणार आहेत. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात ३०३ जागा भरणार आहेत. आॅनलाईन पोलीस भरतीच्या पहिल्या टप्प्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया २५ मे २०१४ पर्यंत होती. जिल्ह्यासाठी ११०७६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. उद्यापासून १६ जूनपर्यंत शारीरिक चाचणी होणार आहे. रोज दीड हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रथम त्यांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. त्यामध्ये उमेदवार पात्र ठरला तर त्याला शारीरिक चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. आठ, नऊ व १५ जून रोजी ही चाचणी बंद राहील. यावेळी सर्वांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. शारीरिक चाचणीनंतर लेखी परीक्षा होणार आहे.
जागा ३०० अन् उमेदवार ११ हजार !
By admin | Updated: June 6, 2014 01:38 IST