शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण महाराष्ट्र रेल्वे विकास परिषद भरवावी : सोळंकी

By admin | Updated: December 24, 2014 00:54 IST

रेल्वेगाड्यांची संख्या वाढविणे आणि स्थानकाचा विस्तार होणे अत्यंत गरजेचे आहे. सन २०१५-१६ या वर्षात कोल्हापूरचे बहुतांश प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा

कोल्हापूर : शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर रेल्वेस्थानकातील समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी तसेच या रेल्वेस्थानकाच्या विकासाला चालना देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्र रेल्वे विकास परिषदेचे तातडीने आयोजन करावे, तसेच या परिषदेला दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे, अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे अ‍ॅँड रोड पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णराव सोळंकी यांनी निवेदनाद्वारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक या शहरांचा औद्योगिक विकास झाला आहे. पर्यटन, औद्योगिक, व्यापार, हॉटेल, आदी विकासाच्या दृष्टीने कोल्हापुरात भरपूर वाव आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांची संख्या वाढविणे आणि स्थानकाचा विस्तार होणे अत्यंत गरजेचे आहे. सन २०१५-१६ या वर्षात कोल्हापूरचे बहुतांश प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा सोळंकी यांनी निवेदनात व्यक्त केली आहे. कोल्हापूर शहर कोकण रेल्वेला जोडल्यास रेल्वेचे पूर्व-पश्चिम जाळे विस्तारले जाऊ शकते. कोल्हापूरच्या पुणे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यात यावे, कोल्हापूर ते किर्लोस्करवाडी पॅसेंजर गाड्यांची संख्या वाढवावी, डब्यांची संख्या वाढवावी, कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट गाडी सुरू करावी, कोल्हापूर-हैदराबाद व तिरूपती या गाड्या सोलापूरमार्गे सोडल्यास हैदराबादचे अंतर ३५० किलोमीटरने कमी होणार आहे. रात्री सुटणारी कोल्हापूर-सोलापूर गाडी पूर्ववत सकाळी सोडण्यात यावी, आठवड्यातून एकदा धावणाऱ्या दिल्ली, अहमदाबाद गाड्या आठवड्यातून तीन वेळा सोडण्यात याव्यात. जयपूर, अजमेर, जम्मू-काश्मीरसाठी नवीन गाड्या सुरू कराव्यात, कोयना एक्स्प्रेस गाडीच्या डब्यांची संख्या वाढविण्यात यावी, कोल्हापुरातील प्लॅटफॉर्मची संख्या वाढविण्यात यावी, आदी मागण्यांकडे सोळंकी यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.