शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक पोलिसांच्या मारहाणीत जवान जखमी

By admin | Updated: May 18, 2015 00:56 IST

पोलिसांत तक्रार : महाराष्ट्र हद्दीत घटना; लष्करी जवान कावजी खोतवाडीचा

मिरज : पोलिसांशी वादावादी केल्याच्या कारणावरून मिरज तालुक्यातील कावजी खोतवाडी येथील भारतीय लष्करातील जवान प्रमोद पतंगराव पाटील (वय ३८) यांना कागवाड पोलिसांनी सीमा ओलांडून म्हैसाळ हद्दीत येऊन बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या पाटील यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे. लष्करात सिकंदराबाद येथे नाईक म्हणून काम करणारे प्रमोद पाटील हे दि. ३ मे रोजी कुटुंबीयांसोबत मालवाहू रिक्षातून कर्नाटकात मायाक्का चिंचणी येथे देवदर्शनासाठी जात असताना कागवाड येथे पोलिसांनी त्यांना अडविले. मालवाहू रिक्षातून प्रवास करीत असल्याच्या कारणावरून वादावादी झाल्याने कागवाड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीशैल कौजलगी यांनी प्रमोद पाटील व रिक्षाचालक किशोर मुळीक यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. अथणी न्यायालयात जामिनावर मुक्तता झाल्यानंतर प्रमोद पाटील यांनी कागवाड पोलिसांनी जप्त केलेला वाहन चालविण्याचा परवाना व वाहनाची कागदपत्रे मागितली होती. मात्र, कागवाड पोलिसांनी वाहन चालविण्याचा परवाना हरविल्याचा पवित्रा घेतल्याने प्रमोद पाटील व उपनिरीक्षक श्रीशैल कौजलगी यांच्यात वादावादी झाली. परवाना परत देत नसल्याबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगून प्रमोद पाटील शनिवारी सायंकाळी कागवाड येथून मोटारसायकलवरून परत मिरजेकडे येत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल कौजलगी यांच्यासह बसाप्पा व संतोष नामक पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस जीपमधून (केए २२, जी ३६८) पाटील यांचा पाठलाग केला. सीमा ओलांडून म्हैसाळजवळ येऊन उपनिरीक्षक कौजलगी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्रमोद पाटील यांना काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार आहे. मारहाणीत जखमी पाटील यांना रस्त्याकडेला टाकून कर्नाटक पोलीस परत निघून गेले. रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांनी प्रमोद पाटील यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मारहाणीबाबत प्रमोद पाटील यांनी मिरज पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नसल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)