करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील सैन्यात दाखल झालेल्या पाच जवानांचा आजी-माजी सैनिक संघटना व ‘जय जवान..जय किसान’ फौंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.
गावातील माजी सैनिक शरद खराडे यांचा मुलगा ओंकार खराडे, वीरपत्नी सुरेखा इळके यांचा मुलगा प्रथमेश इळके, भूषण कृष्णा बेडक्याळे, ऋषिकेश बाळू येसादे, दिनेश कृष्णराव आगलावे या पाच जवानांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच प्रवीण माळी, कुमार पाटील, तानाजी पाटील, महादेव चिनगुडे, समीर गोकाककर, चंद्रकांत लष्करे, बाळू पोवार, चंद्रकांत राजे, शशिकांत चौगुले, बबन चौगुले, सुभाष इंगळे, हरिबा जाधव, जोतिबा भोसले, शामराव हातकर, रंगराव भोईटे, संभाजी जाधव, राजकुमार माने, आदी उपस्थित होते.
---------------------
फोटो ओळी : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथे सैन्यदलात भरती झालेल्या युवकांचा ''''जय जवान..जय किसान'''' फौंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रविण माळी, कुमार पाटील, समीर गोकाककर, रंगराव भोईटे आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०४१२२०२०-गड-०८