सरसदेशाच्या प्रगतीमध्ये शहरांची भूमिकाआपल्या देशाची ६० टक्के वित्तीय चक्रे शहरकेंद्रित हलतात. देशविकासाला लागणारा ८० टक्के कर शहरांतून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या मिळतो; त्यामुळे शहरांचा योग्य विकास हा सध्या कळीचा मुद्दा होऊ पाहत आहे. खेड्यांमधून शहरात येणाऱ्यांचा लोंढा वाढतच आहे. त्यामुळे २०२५ साली ७० टक्के लोकसंख्या शहरात राहू लागेल, असा अंदाज आहे. भारतातील शहरांची वाढ ही कागदावर शाई टाकल्यावर वेडीवाकडी जशी पसरते, त्याप्रमाणे अस्ताव्यस्त झाली आहे. ब्रिटिशांनी दिल्लीसारखी तर अलीकडील चंदीगडसारखी वसलेली शहरे सोडली, तर नागरी नियोजनाच्यादृष्टीने आपली शहरे प्लॅनिंग नसलेल्यांमध्येच मोडतात. आता तरी योग्य ती वाटचाल करून गाडी थोडी तरी रुळांवर आणण्याची गरज आहे. त्या दृष्टीने नवीन सरकारचे ‘स्मार्ट सिटीज’चे स्वप्न योग्य दिशेने पुढे गेल्यास शहरे सुधारतील, यात शंका नाही. - प्रमोद बेरी, आर्किटेक्ट स्पेनमध्ये राबविलेल्या नियमाप्रमाणे कुठलीही प्रचंड क्षेत्रातील अवाजवी जागा गेल्या २५ वर्षांत वापरली गेली नसेल, तर अशा अवाजवी जागेतील फक्त २० टक्के क्षेत्र नागरी तसेच कल्चरल अॅमेनिटीज व अल्प खर्चातील घरबांधणीसाठी घेणे गरजेचे झाले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास कालांतराने अधिक विचार करता येईल. - प्रमोद बेरी, आर्किटेक्ट कोल्हापूरचा महाराष्ट्रातील ‘स्मार्ट सिटी’च्या यादीत समावेश होऊन निधी उपलब्ध व्हायचा असेल तर आपण नेहमीचे निकष तर योग्य तऱ्हेने मांडलेच पाहिजेत; पण आपल्याकडे असणारी खासियत, वेगळेपण ज्यामुळे इतरांपेक्षा आपला हक्क जास्त आहे, तेही मांडले पाहिजे.नव्या सरकारचे सर्वमान्य निकष स्मार्ट सिटीज होणार, असे जाहीर केल्यानंतर या विषयावर वृत्तपत्रे, तांत्रिक आणि मासिक परिषदांमधून प्रामुख्याने काही समान निकष पुढे आले आहेत. ते असे : जीवनमानाची गुणवत्ता सुधारणे (स्मार्ट सिटीजमध्ये राहणे सुकर तर व्हावेच; पण सर्वांगीण विकासात्मक हवे.)पाणी, हवा व आवाजाचे प्रदूषण कमी करणे, दळणवळण सुलभ होणे,सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होणे, पादचारीसन्मुख रस्ते व फुटपाथ यांचा अपंग व वयस्कर लोकांना सुलभ वापर अपेक्षित आहे. (गावातील सर्व इमारतींचे प्रवेशद्वारही तसेच हवे.),काही रस्ते ‘पार्ट टाइम’ तरी पादचारीसन्मुख असावेत, तर काही रस्ते पूर्णत: सकाळी आठ ते रात्री १० पर्यंत जवळजवळ पूर्णत: तसे ठेवता येतील. नदी व नालेस्वच्छता, ज्या बिल्डिंगच्या गच्च्या हरित वापराच्या असतील त्यांना, तसेच पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, मैला परिवर्तन, सूर्यऊर्जा वापर, आदी हरिततत्त्वांचा वापर करणाऱ्यांना करांमध्ये भरीव सूट.झोपटपट्टी निर्मूलन तसेच सर्वांना शौचालयाची सोय व वापरावयाची सक्ती.सार्वजनिक वाहनतळाची योग्य सोय.वेगळे फेरीवाले विभाग तयार करणे.जुळ्या शहरांचा विचार.योग्य प्रतीच्या व तत्पर महापालिका सेवा उपलब्ध असणे.मनुष्यबळ निर्मिती व रोजगार उपलब्धता यासाठी औद्योगिक, बांधकाम, पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती.कमीत कमी गुन्हे असणारे शहर.कचरा व्यवस्थापन, सांडपाणी ट्रीटमेंट, ड्रेनेज मेंटेनन्स, आदी बाबींमध्ये यंत्रसामग्रीचा वापर.शहरातील आर्किटेक्टस, इंजिनिअर्स, कारखानदार, व्यापारी, आदी संस्थांचा प्लॅनिंग प्रक्रियेत सकारात्मक सहभाग करून घेणे.थोडक्यात, ‘स्मार्ट सिटी’मध्ये रहिवाशांचे जीवनमान आर्थिकदृष्ट्या सुधारण्याबरोबर सर्वांगीण सुधारणे अपेक्षित आहे.01कोल्हापूरमध्ये टुरिझम (पर्यटन) व रिलिजियस टुरिझम (धार्मिक पर्यटन) याला अजून खूपच वाव आहे. अंबाबाई, जोतिबा देऊळ, कोल्हापूरच्या आसपास तासाच्या अंतरावर असणारी जंगले व थंड हवेची ठिकाणे या व इतर चर्चा, बाबींचे जबरदस्त मार्केटिंग होणे गरजेचे आहे. सध्या अंबाबाई दर्शनासाठी पावसाळा असूनही प्रतिदिन २५ हजार, उन्हाळ््यात प्रतिदिन ७५ हजार आणि दसऱ्यासारख्या सणामध्ये किमान सव्वा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.02कोल्हापूरचा चप्पल व चांदी व्यवसायही अधिक विकसित होऊ शकतो. कोल्हापूरच्या खाद्यपदार्थांची वेगळी अशी खासियत आहे. त्याचेही मार्केटिंग होऊ शकते. ०403‘कलापूर’ असल्याने आर्ट व क्राफ्ट सिटी म्हणून बनविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.देशातील इतर मोठ्या शहरांत असणाऱ्या सुविधा. उदा. - प्राणिसंग्रहालय, आर्ट गॅलरी, आर्ट म्युझियम, क्रीडा केंद्र, आदी आपल्याकडे होणे अत्यंत गरजेचे आहे. ०6कोल्हापूर शहरामध्ये नॅशनल लेव्हलचे कन्व्हेशन सेंटर व एक्झिबिशन सेंटर झाल्यास शहर विकास होऊ शकतो. 10शहराचे देशांतील इतर भागांबरोबरचे दळणवळण सुविधापूर्वक सुधारण्यासाठी विमानसेवेची पुनर्सुरुवात, कोकण रेल्वे कनेक्टिव्हिटी, सर्व जिल्हास्तरीय रस्त्यांचे चौपदरीकरण (२ + २), आदी गरजेचे आहे. 12हे सर्व होण्यासाठी शहराची क्षेत्रवाढ तसेच बिनवापराच्या जागांचा अंशत: वापर होणे गरजेचे आहे. १९५१ साली शहराची सीमा ६७ चौरस किलोमीटर होती. तेव्हाची अंदाजे एक लाख लोकसंख्या आता आठ लाखांच्या आसपास जाऊन क्षेत्रामध्ये फारसा काहीही बदल झालेला नाही. 13शहरामध्ये एकहाती असणाऱ्या जागा, उदा. सरकारी क्षेत्रे, न्यू पॅलेस परिसर, शिवाजी विद्यापीठ परिसर, आदींच्या अंशत: जागेच्या वापराचा प्राधान्याने विचार व्हावा.