शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

महापूर, कोरोनावेळी मदतीचा हात देणाऱ्यांचा ‘स्मॅक’कडून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

कोल्हापूर : महापूर, वादळ आणि कोरोना संकटावेळी आरोग्य सुविधा आणि साधनांचा पुरवठा, कामगारांना पाठबळ, आदी स्वरूपात मदतीचा हात देणाऱ्यांचा ...

कोल्हापूर : महापूर, वादळ आणि कोरोना संकटावेळी आरोग्य सुविधा आणि साधनांचा पुरवठा, कामगारांना पाठबळ, आदी स्वरूपात मदतीचा हात देणाऱ्यांचा शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक)कडून सोमवारी ‘स्मॅक सन्मान’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये उद्योजक, महावितरणचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

‘स्मॅक’च्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त केशवराव भोसले नाट्यगृहात प्रेरणादायी वक्ते आणि शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते मानपत्र, शाल, कापडी पुष्पगुच्छ देऊन संकट काळात मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, उद्योजक रामप्रताप झंवर, चंद्रशेखर डोली, दीपक आणि भरत जाधव, सचिन आणि सोहन शिरगावकर, महेंद्र आणि प्रकाश राठोड, पद्माकर आणि शिरीष सप्रे, सुनील जनवाडकर, सुरेंद्र जैन, तुकाराम पाटील, दीपक परांडेकर, प्रमोद पाटील, शेखर कुसाळे, राजेंद्र चौगुले, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी प्रवीण गिल्डा, महावितरणचे सहायक अभियंता संदीप गावडे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर इंद्रजित देशमुख यांनी ‘उद्योजकता व कुटुंब व्यवस्था’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला राजू पाटील, जयदीप चौगले, एम. वाय. पाटील, सचिन पाटील, नीरज झंवर, अमर जाधव, श्यामसुंदर तोतला, जयदत्त जोशीलकर, आदी उपस्थित होते. ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी आभार मानले.

चौकट

सृजनशीलता, संवादाचा संस्कार आवश्यक

जुन्या पिढीने अनुभवातून उद्योग उभारला. त्यामध्ये सध्या दुसरी पिढी योगदान देत आहे. शिक्षणानंतर तिसरी पिढी थेट उद्योगात येत आहे. त्यामुळे राहात असलेला ‘नॉलेज गॅप’ दूर करण्यासह आपल्या पाल्याला चांगला उद्योजक घडवायचे असेल, तर त्याच्यावर सृजनशीलता, संवाद कौशल्य, इतरांना मदतीचा हात देण्याचे संस्कार रूजविणे आवश्यक असल्याचे इंद्रजित देशमुख यांनी सांगितले. आपल्याकडील माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे रूपांतर दृष्टीमध्ये व्हावे. ९५ टक्के प्रेम आणि ५ टक्के क्रोध या तत्वाने पाल्यांना घडवावे. पाल्यांमधील गुण, क्षमता ओळखून त्यांना ते देण्याची जबाबदारी पालकांनी पार पाडावी, असे सांगितले.

फोटो (१५०२२०२१-कोल-स्मॅक सत्कार) : कोल्हापुरात सोमवारी ‘स्मॅक’कडून कोरोना कालावधीत योगदान देणारे ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांना शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, कापडी पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी डावीकडून सोहन शिरगावकर, राजू पाटील, नीरज झंवर, जयदीप चौगले, अतुल पाटील, एम. वाय. पाटील उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)