शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सहा दरोडेखोरांना पाठलाग करून पकडले

By admin | Updated: November 19, 2014 23:24 IST

कोल्हापुरात कारवाई : दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : रात्रगस्त घालत असताना लक्ष्मीपुरी पोलिसांनी काल, मंगळवारी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून चटणीपूड, कुकरी, किल्ल्यांचा जुडगा, लहान बॅटरी, नायलॉनची दोरी, मोबाईल, तीन मोटारसायकली असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या सर्व दरोडेखोरांवर विविध पोलीस ठाण्यांत २७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांना आज, बुधवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी, आदी गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार कोल्हापूर शहरात एकत्र जमून दरोडा टाकणार आहेत, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस पथक पंचगंगा नदीघाट परिसरातून पाणंदीतून जगदगुरू शंकराचार्य मठाकडे जात असताना जलवाहिनीच्या पुलाखाली सहा तरुण अंधारात एकत्र थांबलेले दिसले. ते पोलिसांची गाडी पाहून पळून जाण्याचा प्रयत्नात असताना त्यांना पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दरोडा टाकण्यासाठी जात असल्याची कबुली दिली. दरम्यान, अटक केलेल्यांमध्ये संशयित आकाश चंद्रकांत कांबळे (वय २१, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली), इर्शाद अल्ताफ बागवान (२४), पिंटू ऊर्फ अनिल प्रभाकर शिंदे (२६), दादू प्रभाकर शिंदे (२४, सर्व रा. यादवनगर), अविनाश अशोक हुलस्वार (२३, रा. रविवार पेठ), लखन ऊर्फ अनिल मोहन चौगुले (२५, रा. मारुती मंदिर, रामानंदनगर). (प्रतिनिधी) विविध पोलीस ठाण्यांत २७ गु्हे दाखल अटक केलेल्या या अट्टल दरोडेखोरांवर यापूर्वी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये संशयित आरोपी आकाश कांबळे याच्यावर घरफोडी, मोटारसायकल चोरीचे पाच, इर्शाद बागवानवर १९, तर दादू शिंदेवर दोन असे गुन्हे दाखल आहेत.