शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर होणार सहा उड्डाणपूल

By admin | Updated: December 25, 2014 00:14 IST

कागल ते सातारा : हिवाळी अधिवेशनात शिक्कामोर्तब

सतीश पाटील - शिरोली -पुणे-बंगलोर महामार्गावर कागल ते सातारा या १३३ कि.मी.च्या अंतरात सहा नवीन उड्डाणपूल होणार आहेत. राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब केले.पुणे-बंगलोर दुपदरीवर अपघातांचे प्रमाण वाढले. वाहतूक वाढली म्हणून चतुष्कोन योजनेंतर्गत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. कागल ते सातारा या १३३ कि.मी. रस्त्याचे काम सन २००६ पर्यंत पूर्ण करावयाचे होते. या कामासाठी अंदाजे ५५० कोटी रुपये खर्च होता. सुमारे पाच ठेकेदार या रस्त्याचे काम करत होते.अनेकदा मुख्य मार्गात बदल करण्यात आला. हे काम दोन वर्षांत पूर्ण करावयाचे होते. त्यामुळे रस्ते विकास महामंडळ आणि या पाच ठेकेदारांनी घाईगडबडीने काम पूर्ण केले. रस्त्याचे काम सुरू असताना महामार्ग शेजारील अनेक गावांनी उड्डाण पूल, भुयारी मार्ग यांची मागणी केली; पण आयत्यावेळी आलेल्या मागण्या रस्ते विकास महामंडळाने गांभीर्याने घेतल्या नाहीत व महामार्ग २००६ ला वाहतुकीस खुला केला.अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी चौपदरीकरण केले; पण अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले. सन २००८ ते सन २०१४ या सात वर्षात या कागल ते सातारा या १३३ कि.मी. मध्ये सुमारे ७४९ अपघात झाले आहेत. यात १०४३ जखमी, तर २२६ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. यातील बरेचसे अपघात गोकुळ शिरगाव, नागाव फाटा, टोप, अंबप फाटा, येलूर, इस्लामपूर फाटा येथे झाले आहेत. ही या मार्गावरील प्रमुख अपघात क्षेत्रेच आहेत. याठिकाणी सतत वाहनांची वर्दळ असते. याठिकाणी उड्डाणपुलाची मागणी स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीने केली होती; पण त्यावेळी रस्ते विकास महामंडळाने व शासनाने ही गांभीर्याने याकडे लक्ष दिले नाही. याच सहा ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढल्याने अखेर शासनाने या रस्त्याचे सहा पदरीकरण करताना याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय नागपूर येथे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात घेण्यात आला. या सहा ठिकाणी उड्डाणपूल झाले की निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.उड्डाणपुलांची ठिकाणेगोकुळ शिरगाव, नागाव फाटा, टोप, अंबप फाटा, येलूर, इस्लामपूर फाटा.