या निवेदनात म्हटले आहे की, लर्निंग लायसन्स विभागातील कनिष्ठ लिपिकाकडून पपरीक्षार्थ्यांशी उद्धट बोलून अपमान करीत असल्याची लेखी तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. त्याच्याकडून दादागिरी सुरूच ठेवली आहे. वाहनधारक संघटनेच्या सभासदाच्या मुलासोबतही त्यांनी वाद घातला. माझ्या विरोधात कोणाकडे तक्रार करणार, तेथे मी पण तुमच्याबरोबर येतो. माझ्यावर काय फरक पडत नाही, अशी धमकीही दिली. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखले पाहिजे. यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा वाहनधारक संघाचे राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले, अभिषेक देवणे, विजय गायकवाड, विजय जेधे, दिलीप सूर्यवंशी, वसंत पाटील, दीपक पोवार, उत्तम मुरावणे, आदींनी दिला.
फोटो : १४१२२०२०२० कोल वाहनधारक निदर्शने
ओळी : लर्निंग लायसेन्स विभागातील उद्धट वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी कोल्हापुरातील आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले.