शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळला नगरपरिषद मंजुरीचे त्रांगडे सुटता सुटेना

By admin | Updated: September 23, 2016 00:39 IST

मतदारसंघ अंतिम फेररचना आज : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता

संदीप बावचे-- शिरोळ -खासदार, आमदारांच्या पाठपुराव्यामुळे शिरोळ नगरपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन, ग्रामपंचायतीने नगरपरिषदेसाठी दिलेला ठराव त्यातच जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाची पुनर्ररचना, नगरपरिषदेप्रश्नी ‘आंदोलन अंकुश’ या सामाजिक संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका यामुळे शिरोळ नगरपरिषद मंजूर केव्हा होणार? हाच प्रश्न सध्या चर्चेचा बनला आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारसंघ फेररचना कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिरोळ नगरपरिषदेचा विषय ऐरणीवर आला. आंदोलन अंकुश या सामाजिक संस्थेने नगरपरिषदेप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेप्रश्नी आतापर्यंत तीनवेळा सुनावणी झाली. मात्र, निर्णय अद्याप झालेला नाही. खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळला नगरपरिषद मंजूर करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला नगरपरिषदेप्रश्नी ग्रामसभा व मासिक सभा घेऊन ठराव देण्याबाबत आदेश दिले होते. १४ सप्टेंबरला मासिक सभेचा, तर १६ सप्टेंबरला ग्रामसभेचा ठराव करण्यात आला आहे. हा ठराव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. जि.प. व पं.स. मतदारसंघ अंतिम फेररचना आज, शुक्रवारी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी नगरपरिषदेचा निर्णय अपेक्षित होता. मात्र, तो निर्णय एक महिना लांबणीवर गेल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतरच नगरपरिषद मंजुरीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. असे झाले तर निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना काही काळच पदाचा कार्यकाल मिळणार आहे. सध्या जर-तरच्या गोष्टीवरच नगरपरिषदेची चर्चा शहरात घुमली आहे.मुंबईत आज सुनावणीशिरोळ नगरपरिषदेप्रश्नी आंदोलन अंकुश या सामाजिक संस्थेने दाखल केलेल्या याचिकेची आज, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे शिरोळकरांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून नगरपरिषद मंजुरीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. त्याकडेही लक्ष लागून राहिले आहे. उलटसुलट चर्चाशिरोळ तालुक्यात आठऐवजी सात जिल्हा परिषद मतदारसंघ होणार आहेत. मतदारसंघ पुनर्ररचना कार्यक्रम शिवाय शिरोळला नगरपरिषद मंजुरीचा विषय यामुळे शिरोळचा जिल्हा परिषद मतदारसंघ रद्द होणार की नाही याबाबत शहरात उलटसुलट चर्चा आहे. एकूणच नगरपरिषदेचा निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे.