बसर्गेतील विद्यार्थ्यांना मदत
नूल : बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील एस. एम. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रीमंत बाबासाहेब नाडगौंडे मेमोरिअल ट्रस्टतर्फे मास्क, सॅनिटायझर, स्टँड, कानटोपी आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा वर्षादेवी नाडगोंडे होत्या. यावेळी सचिव रामचंद्र टेळी, संचालक मिलिंद रेंदाळकर, महेश नाईक यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर यांनी स्वागत केले. एम. एस. जोडगुद्री यांनी आभार मानले.
३) दूध संस्था कर्मचाऱ्यांना विमा कवच
गडहिंग्लज : जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेतर्फे दूध संस्था कर्मचाऱ्यांसाठी कोरोना विमा संरक्षण कवच सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत महादेव मगदूम (बेकनाळ), संदीप सूर्यवंशी (सुळे), सुभाष गाईंगडे (वाटंगी) यांना प्रत्येकी १० हजाराचा, तर मुमेवाडी येथील रेखा एकनाथ साठे यांना सव्वालाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी विश्वास पाटील, रवींद्र करंबळी, केरबा पाटील, शामराव पाटील, सुरेश जाधव, के. वाय. पाटील, भैरू तानवडे, रायाप्पा धुळाज उपस्थित होते.