शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST

गडहिंग्लज : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यानातील सावकरांच्या अर्धपुतळ्याला अभिषेक ...

गडहिंग्लज : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यानातील सावकरांच्या अर्धपुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. या वेळी प्रीतम कापसे, संदीप मोर्ती, तुषार वाटवे, उदय कुरबेट्टी, मनोज पवार, योगेश शहा, सुनील नारापगोळ, शुभम कुलकर्णी, ओंकार देशपांडे, विकास रावळ उपस्थित होते.

----------------------

‘संत गजानन’मध्ये राष्ट्रीय कार्यशाळा

गडहिंग्लज : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२१’ ही कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत ७७७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्र. प्राचार्य डॉ. ए. टी. पिसे, डॉ. के. के. जाधव, डॉ. पी. एम. जोशी, प्राचार्य एस. ए. पाटील, डॉ. ए. पी. मित्तल, प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी मार्गदर्शन केले.

----------------------

गणेश मंदिराला नगारा अर्पण

गडहिंग्लज : शहरातील गणेश मंदिराला शहरातील आनंद बिलावर यांनी तयार केलेला नगारा अर्पण करण्यात आला. महेश घुगरी यांच्याकडे हा नगारा सुपूर्द करण्यात आला. यापूर्वी महालक्ष्मी, हाळलक्ष्मी व काळभैरी मंदिराला बिलावर यांनी नगारा अर्पण केला आहे. या वेळी संतोष चौगुले, गोविंदा बिलावर, वामन बिलावर, राजनंदिनी बिलावर, तेजस्विनी बिलावर आदी उपस्थित होते.

----------------------

शिवराज महाविद्यालयात ऑनलाइन व्याख्यान

गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दत्तक गावांमध्ये आयुर्वेदिक आणि जागतिक महामारी या विषयावर ऑनलाइन व्याख्यान झाले. डॉ. तेजस्विनी कोतमिरे यांनी कोरोना काळात घ्यावयाची काळजी, शासकीय नियमांचे पालन तर कोरोना काळात घरात राहून कसे उपचार घ्यावेत याविषयी मार्गदर्शन केले.

या वेळी कडगाव, ऐनापूर, भडगाव, अत्याळ, वडरगे, करंबळी, चन्नेकुप्पी आदी गावचे सरपंच व पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला.

----------------------

गडहिंग्लजमध्ये खिचडी वाटप

गडहिंग्लज : नेसरी व हिडदुगी येथील टायगर ग्रुपच्या साईप्रसाद रेडेकर यांच्या हस्ते येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधितांच्या नातेवाईक व बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना खिचडी, केळी व मिनरचे पाणी वाटप करण्यात आले. शहरातील उपजिल्हा रुग्णालय, पोलीस ठाणे, रिक्षा स्टॉप, नेसरी पोलीस ठाणे, पेट्रोल पंप या ठिकाणीही मदत पोहोच करण्यात आली.

याकामी अक्षय रेडेकर, राजू नाईक, अक्षय पाटील, आकाश हेरेकर, विनायक पाटील, विनायक पाटील, अक्षय नावलगी, गणेश पाटील, विशाल सुतार, संदीप बामणे, ओमकार खोत आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.