शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST

गडहिंग्लज : चंदनकूड (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलांना पुस्तके आणि वह्या भेट दिल्या. राणी भेंडिगिरी, ...

गडहिंग्लज : चंदनकूड (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलांना पुस्तके आणि वह्या भेट दिल्या. राणी भेंडिगिरी, ज्योती पाटील, मंजुनाथ पाटील, बसवराज पाटील, सचिन भेंडिगिरी, सुहास पाटील, श्रीधर पाटील यांनी हा उपक्रम राबविला.

गडहिंग्लज तालुक्यातील ‘१९१ आशा’ आंदोलनात सहभागी

गडहिंग्लज : शासकीय सेवेत कायम करण्यासह विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात गडहिंग्लज तालुक्यातील १९१ आशा सेविकांनी व ६ गटप्रवर्तक सहभागी झाले होते. त्यामुळे कोरोनाकाळातील सेवेवर परिणाम झाला आहे.

निंगुडगे येथे रक्तदान शिबिर

गडहिंग्लज : निंगुडगे (ता. आजरा) येथे आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५५ पिशव्या रक्तसंकलन झाले. या वेळी जयवंतराव शिंपी, सपोनि बालाजी भांगे, नगरसेवक अभिषेक शिंपी, सरपंच कृष्णा कुंभार, उपसरपंच प्रमोद देसाई, सम्राट सरदेसाई आदी उपस्थित होते.

‘शिवराज’मध्ये मार्गदर्शन

गडहिंग्लज : येथील शिवराज विद्या संकुलात वाणिज्य विभाग व लोटस् ग्लोबल व्लेथ यांच्या संयुक्त विद्यमाने शेअर बाजार जनजागृती कार्यक्रम पार पडला. महेश चौगुले यांनी प्रास्ताविक केले. दीपक खेडेकर यांनी स्वागत केले.

या वेळी प्रा. श्रीकांता लहरी-सागा यांनी शेअर बाजार गुंतवणूक, पंकज मठकर यांनी गुंतवणुकीची माध्यमे, शेअर बाजारामधील भागांची खरेदी-विक्री, गुंतवणूक कशी व कुठे करणे याविषयी मार्गदर्शन केले ‘सेबी’च्या गुंतवणूक कार्यक्रमातंर्गत प्रा. के. थंगराज व प्रा. राहुल धवन यंनी ‘म्युचुअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट’ याविषयी मार्गदर्शन केले.

या वेळी संस्थाध्यक्ष किसनराव कुराडे, सचिव अनिल कुराडे, प्राचार्य एस. एम. कदम, बी. एम. जाधव, बियामा वाटंगी, नाझिया बोजगर आदी उपस्थित होते.

तनवडी ग्रामपंचायतीची १०० टक्के करवसुली

गडहिंग्लज : तनवडी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीने २०२०-२१ या वर्षातील घरफाळ्याची सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के वसुली झाली. याकामी सरपंच बसवराज आरबोळे, उपसरपंच सागर सुतार, ग्रामसेवक पी. एम. रावण यांच्यासह सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

चंदगड आगाराची पुणे-मुंबई बसफेरी सुरू

चंदगड : चंदगड आगाराने कोल्हापूर, पुणे व मुंबई या बसफेऱ्या पूर्ववत सुरू केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन-चार महिन्यांपासून या फेऱ्या बंद होत्या. चंदगड-बेळगाव बसफेऱ्यांसह ग्रामीण भागातील फेऱ्याही लवकरात लवकर सुरू करावेत, अशी प्रवाशांची मागणी आहे.