शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या निकषाबाबत सावळा गोंधळ

By admin | Updated: June 13, 2017 01:06 IST

अनेक मुद्द्यांबाबत अस्पष्टता : कर्जमर्यादा, काळ निश्चितता, नव्या कर्जपुरवठ्याबाबतचे प्रश्न अनुत्तरितच

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : राज्य सरकारने घाईगडबडीत अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली, पण त्याचबाबतच्या निकषावरून शेतकऱ्यांसह बँकांच्या पातळीवर गोंधळ निर्माण झाला आहे. कधीपर्यंतचे कर्ज माफ होणार? कर्जमर्यादेचा निकष लावणार का? याची स्पष्टता नाही. त्याचबरोबर सोमवारपासून थकीत शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा होणार असल्याचे सरकारने जाहीर केले खरे, पण बॅँकिंग नियमानुसार थकीत रक्कम जमा झाल्याशिवाय नवीन कर्जपुरवठा करता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची संभ्रमावस्था पसरली आहे. शेतकरी विकास संस्थेच्या माध्यमातून दोन-तीन प्रकारची कर्जे उचलतो. सरकारने पीककर्जाबरोबर संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर थकीत असलेले मध्यम मुदतीचे कर्जही माफ करणार का? याविषयी स्पष्टता नाही. सरकारने माहिती मागवताना मार्च २०१७ अखेर थकीत शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे; पण कर्जमाफी जाहीर करताना कोणत्या कालावधीपर्यंतचे कर्ज माफ हे न सांगितल्याने शेतकऱ्यांसह विकास संस्थांच्या (पान ४ वर)कर्ज मागणीसाठी शेतकरी जिल्हा बँकेतसरकारने सोमवारपासून थकीत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरू होणार असून बॅँकेतून खरीप कर्जाची उचल करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सोमवारी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या शाखांत जाऊन कर्जाची मागणी केली; पण रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणानुसार थकबाकीदाराला कर्ज देता येत नसल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर हिरमुसल्या चेहऱ्याने शेतकरी परतल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा बँकेला ‘येणे-देणे’चा अनुभव वाईटकेंद्र सरकारच्या २००८ मधील कर्जमाफीत शेतकऱ्यांच्या खात्याला जमा व सरकारकडून येणे दाखविले होते, पण ‘नाबार्ड’च्या तपासणीत ११२ कोटी अपात्र ठरविल्याने या जमा-खर्चाने जिल्हा बँक अडचणीत आली होती. हा अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने जरी कर्जमाफी जाहीर केली असली तरी जिल्हा बँक ‘येणे-देणे’च्या नादाला लागणार नाही. पीक व मध्यम मुदतीचा सर्वाधिक कर्जपुरवठा जिल्हा बँकेच्या माध्यमातून होतो. पाच एकरांच्या आतील ४९ हजार ६९७ तर पाच एकरांवरील ३७८४ असे ५३ हजार ४८१ थकबाकीदार शेतकरी आहेत; पण नियमित कर्जपुरवठा करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. पाच एकरांच्या आतील व वरील २ लाख १५ हजार ९०६ शेतकरी आहेत. निकषाऐवजी निकड पाहालोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अल्पभूधारक या निकषापेक्षा त्या शेतकऱ्याची निकड पाहणे आवश्यक आहे. कारण आम्ही आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नेतृत्व करतो आहोत, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. मुंबई येथे उच्चस्तरीय मंत्रिगटाबरोबर रविवारी (दि. ११) शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीची बैठक झाल्यानंतर सोमवारी खासदार शेट्टी इचलकरंजीत आले असताना शेतकऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे वार्षिक उलाढाल असलेले बॅँक खाते तपासावे. ज्यामुळे त्याला असलेली आर्थिक निकड लक्षात येईल. अशा प्रकारच्या तपासण्या करून नुकसानीमध्ये जाऊन कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निकष (पान ४ वर)